शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, धावत्या गाडीत आता लगेच दाखल करा तक्रार

By admin | Updated: July 14, 2015 02:06 IST

रेल्वे प्रशासनाचे आवाहन; जीआरपी व आरपीएफ जवानांव्यतिरिक्त कोच अटेंडन्ट, गार्ड, कंडक्टर येईल मतदतीला धावून.

राम देशपांडे / अकोला- धावत्या गाडीमध्ये साहित्य चोरी किंवा दरोड्यासोबतच महिला छेडखानीच्या घटना घडल्यास, त्यासंदर्भात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्यासाठी प्रवाशांना जवळच्या स्थानकावरील रेल्वे पोलीस ठाणे गाठावे लागत होते. रेल्वे प्रशासनाने १0 जुलै पासून प्रवाशांच्या सुविधेखातर धावत्या गाडीमध्ये ताबडतोब तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगी जीआरपी किंवा आरपीएफ पोलीसांव्यतिरिक्त कोच कन्डक्टर, रेल्वे कोच अटेंडन्ट, किंवा गाडीचा गार्ड हे देखील घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहय़ धरले जाणार आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये घडलेल्या बहुतांश चोरीच्या आणि दरोड्याच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यास रेल्वे पोलीस अपयशी ठरतात. जवळच्या रेल्वे स्थानकावरील जीआरपी किंवा आरपीएफ पोलीसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर सुरू होणारा पोलीस तपास या प्रक्रियेत अधिक वेळ जात असल्याने, बहुतांश घटनांमधील आरोपी पोबारा होण्यास यशस्वी ठरतात. अशा घटनांसंदर्भात प्रवाशांना धावत्या गाडीमध्येच तक्रार दाखल करता येईल व तात्काळ आरोपीस वेसण घालता येईल या दृष्टीकोनातून गत अर्थसंकल्पात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तरतूद केली होती. तर लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी एप्रिल-१५ मध्ये केली होती. संपूर्ण देशभरात १0 जुलै पासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे. यापुढे धावत्या गाडीमध्ये साहित्य चोरी, दरोडा किंवा महिल छेडखानी किंवा इतर कुठलिही अप्रिय घटना घडल्यास, प्रवाशांना तात्काळ त्याच गाडीमध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ किंवा जीआरापी पोलीसाजवळील तक्रार रजिस्टरमध्ये लेखी फिर्याद दाखल करता येणार आहे. अशा अतितटीच्या प्रसंगी जीआरपी किंवा आरपीएफ पोलीस उपलब्ध नसल्यास, घटनेची फिर्याद दाखल करून घेण्याचा अधिकार कोच कन्डक्टर, कोच अटेंडन्ट व गार्डला देण्यात आले आहेत. याकरीता संबंधित अधिकार्‍यांकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापील स्वरूपातील एफआयआय अर्ज उपलब्ध राहणार आहेत. तक्रार दाखल होताच त्याबाबतची माहिती संबंधित अधिकारी पुढील रेल्वे स्थानकावरील जीआरपी किंवा आरपीएफ पोलिसांना देतील. आणि त्या स्थानकावर गाडी पोहोचण्यापूर्वीच रेल्वे पोलीस सापळा रचतील. सद्याच्या घटकेला आरपीएफ पोलीस १३00 गाड्यांमध्ये व जीआरपी पोलीस २ हजार २00 गाड्यांमद्ये नियमित तपासणी करण्याचे कार्य करीत असल्याची माहिती आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन या माध्यमातून रेल्वे अधिकार्‍यांनी केले आहे.