VIDEO: पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वेखाली जाणारा प्रवासी बचावला, घटना CCTV कॅमेरात कैद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:29 IST2022-07-25T19:27:33+5:302022-07-25T19:29:29+5:30
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती...याचा प्रत्यय २५ जुलै रोजी सकाळी अकोला रेल्वे स्टेशनवर आला. धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नातील एक प्रवाशी रेल्वेगाडी खाली जाता जाता बचावला.

VIDEO: पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वेखाली जाणारा प्रवासी बचावला, घटना CCTV कॅमेरात कैद!
अकोला :
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती...याचा प्रत्यय २५ जुलै रोजी सकाळी अकोलारेल्वे स्टेशनवर आला. धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नातील एक प्रवाशी रेल्वेगाडी खाली जाता जाता बचावला. तोही केवळ पोलिसांची समयसूचकता आणि सतर्कमुळे भोलाराम नामक प्रवाशाला पोलिसांमुळे जीवनदान मिळाले. ही घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
अमरावती-सुरत एक्स्प्रेस सकाळी १०.३६ वाजता अकोला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. प्रवाशांची गर्दी असल्याने, डब्यांमध्ये जागा पकडण्यासाठी धडपड प्रवाशांची धावपळ सुरू होती. या गाडीला अकोला रेल्वे स्टेशनवर केवळ दोनच मिनिटाचा थांबा आहे. सकाळी १०. ३६ वाजता अमरावती-सुरत एक्स्प्रेस निघाल्यावर प्लॅटफार्म क्र. १ वरून निघाली. दरम्यान एक प्रवासी धावत्या रेल्वे गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला. गाडीने वेग पकडल्याने त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफार्म खाली पडला. खाली पडल्याने त्याचा तोल जाऊन तो गाडीच्या खाली जाणार एवढ्यात, प्लॅटफार्मवरील पीएसआय दिलीप वानखडे, हेड कॉन्स्टेबल विलास पवार यांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्या प्रवाशाला बाजूला ओढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
भोलारामने पोलिसांचे मनोमन आभार मानले. गाडीही थांबल्यामुळे पोलिसांनी त्याला जयपूरला जाण्यासाठी बसवून दिले. पोलिसांच्या धाडसाचे ही कौतुक होत आहे.
VIDEO: पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वेखाली जाणारा प्रवासी बचावला, अकोला रेल्वे स्टेशनवरील घटना pic.twitter.com/fGAYiGnqPu
— Lokmat (@lokmat) July 25, 2022
सर्व घटना सीसीटीव्हीत कैद
अकोला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक १ वर प्रवाशांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सोमवारी सकाळी रेल्वे स्टेशनवरील हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.