स्वप्नांसाठी ती झटली, यशाच्या शिखरावर पोहोचली! स्कूल बस चालकाच्या मुलीची संघर्षगाथा

By नितिन गव्हाळे | Updated: June 18, 2025 14:14 IST2025-06-18T14:13:07+5:302025-06-18T14:14:31+5:30

MHT CET Result 2025: पल्लवीचे वडील, जगन्नाथ निमकंडे, प्रभाप्रकाश कॉन्व्हेंट येथे बस ड्रायव्हर आहेत. रोज सकाळी मुलांना शाळेत पोहोचवताना ते आपल्या मुलांसाठीचं शिक्षणही डोळ्यांत साठवत होते.

Pallavi Nimkande, daughter of a bus driver in Akola district, scored 99.43 percent marks in the MHT CET exam. | स्वप्नांसाठी ती झटली, यशाच्या शिखरावर पोहोचली! स्कूल बस चालकाच्या मुलीची संघर्षगाथा

स्वप्नांसाठी ती झटली, यशाच्या शिखरावर पोहोचली! स्कूल बस चालकाच्या मुलीची संघर्षगाथा

-नितीन गव्हाळे, अकोला
MHT CET Success Story: एक एकर शेत, घरात दररोजच्या गरजांसाठी संघर्ष, आणि वडील एका खाजगी शाळेच्या स्कूल बसचे चालक. अशा परिस्थितीतही एक मुलगी मोठं स्वप्न पाहते. "मला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं आहे!" आणि या स्वप्नासाठी ती झटली. लढली, आणि शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचली.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही गोष्ट आहे, पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पल्लवी जगन्नाथ निमकंडे हिची. एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटात तिने मिळवलेले ९९.४३ टक्के गुण हे तिच्या जिद्दीची पावती आहे. 

पल्लवीचे वडील, जगन्नाथ निमकंडे, प्रभाप्रकाश कॉन्व्हेंट येथे बस ड्रायव्हर आहेत. रोज सकाळी मुलांना शाळेत पोहोचवताना ते आपल्या मुलांसाठीचं शिक्षणही डोळ्यांत साठवत होते. केवळ एक एकर शेतीवर आधारित उत्पन्न, कधी वीज नाही, कधी पुस्तकं उधारीवर, तरीही जगन्नाथ आणि त्यांच्या पत्नीने मुलांच्या शिक्षणासोबत कधी तडजोड केली नाही.

पल्लवीचं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, अकोला येथे झालं. त्यानंतर अकोल्यातील ललित ट्युटोरियल्समध्ये ती शिकू लागली. तिला योग्य दिशादर्शन मिळालं प्रा. ललित काळपांडे सरांकडून. "सरांनी मला अभ्यासात केवळ मदतच केली नाही, तर आत्मविश्वासही दिला. असं ती सांगते.

यशाच्या शिखरावर एक साधी मुलगी

१६ जून रोजी सीईटीचा निकाल लागला. मोबाईलवर गुण पाहताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ९९.४३ टक्के गुण. माझं स्वप्न आता थोडं जवळ आलंय, पण अजून खूप काही शिकायचं आहे. माझं इंजिनिअर बनण्याचं स्वप्न पूर्ण करून आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी मोठं करायचं आहे," पल्लवी ठामपणे म्हणते.

भक्ती मेन १०० पसेंटाईल

स्वप्न मोठं असावं लागतं, पण त्यासाठी कष्ट अजून मोठे असावे लागतात." ही ओळ खरी करुन दाखवलीय अकोल्याच्या भक्ती मनिष मेन हिने. एमएचटी सीईटी पीसीबी गटाचा निकाल १७ जून रोजी जाहीर झाला, आणि या निकालात भक्तीने १०० पर्सेटाईल गुण घेत, थेट महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्राप्त केला. 

भक्ती अकोल्यातील जवाहर नगर येथे राहते. वडील मनिष मेन हे कृषी विभागाच्या बीज प्रमाणीकरण प्रयोगशाळेत अधिकारी आहेत. एकुलती एक असल्याने घरातली सगळी स्वप्नं तिच्यावर केंद्रित होती. 

लहानपणापासून डॉक्टर होण्याचा तिचा ध्यास आता पूर्ण होणार आहे. भक्तीने नीट २०२५ मध्ये ५६७ (एआयआर ६ हजार) त्यासोबतच सीईटीमध्ये तर थेट महाराष्ट्र टॉपर ठरली. तिच्या या दुहेरी यशामागे प्रा. ललित काळपांडे यांचे मार्गदर्शन आहे.

Web Title: Pallavi Nimkande, daughter of a bus driver in Akola district, scored 99.43 percent marks in the MHT CET exam.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.