व्याळा (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. ...
अलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून महिनाभरापूर्वी गावातीलच एका तरुणाने पळविले होते. या प्रेमी युगुलास चान्नी पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. ...
आलेगाव (अकोला): विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचविण्याच्या प्रयत्नात जेठाचाही मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...
अकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉ ...
अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दु पारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांच ...
राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने ना ...
कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात ...
तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ...
तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वरुड वडनेर येथील ५५ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबरच्या रात्री घडली. शे. हारुण शे. गफुर असे मृतकाचे नाव आहे. ...