शाळांमधील प्रतिभावान खेळाडू निवडण्यासाठी गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:10 PM2017-12-08T23:10:52+5:302017-12-08T23:13:43+5:30

अकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएआर) अंतर्गत गॅस अँथॉरिटी ऑफ इंडिया लि.(गेल), अँग्लियन मेडल हिंट कंपनीच्या सहकार्याने गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम राबविल्या जाणार आहे. 

Gail India Star Maharashtra venture to select talented players in schools! | शाळांमधील प्रतिभावान खेळाडू निवडण्यासाठी गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम!

शाळांमधील प्रतिभावान खेळाडू निवडण्यासाठी गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम!

Next
ठळक मुद्दे२0२0 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिकची तयारी ११ ते १७ वयोगटातील खेळाडूंची करणार निवड

नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएआर) अंतर्गत गॅस अँथॉरिटी ऑफ इंडिया लि.(गेल), अँग्लियन मेडल हिंट कंपनीच्या सहकार्याने गेल इंडिया स्टार महाराष्ट्र उपक्रम राबविल्या जाणार आहे. 
नॅशनल युवा को-ऑप. सोसायटी अंतर्गत आगामी २0२0 मध्ये टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिक खेळ डोळय़ांसमोर ठेवून गेल इंडिया स्टार महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शाळांमधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करू शकणार्‍या ११ ते १७ या वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांची जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन या प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या खेळाडूंच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी मैदानी क्रीडा प्रकारातील १00 मी. २00 मी. आणि ४00 मी. धावणे प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 
राज्यातील आठ ठिकाणी चाचणी
गेल इंडिया स्टार महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांमधील खेळाडूंची निवड करण्यासाठी राज्यातील आठ जिल्हय़ांमध्ये, मुंबई शहर, सांगली, बीड, नागपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक आदी ठिकाणी जिल्हा स्तर निवड चाचणी डिसेंबर २0१७ पूर्वी घेण्यात येणार आहे. तसेच राज्य स्तरावर निवड चाचणी ५ डिसेंबर २0१७ ते १५ जानेवारी २0१८ दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार आहे. 

खेळाडू निवडीसाठी शिक्षणाधिकार्‍यांना पत्र
शाळांमधील गुणवान खेळाडू निवडीसाठी शिक्षणाधिकार्‍यांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहसंचालकांनी पत्र पाठवून गेल स्टार इंडिया महाराष्ट्र उपक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक उपलब्ध करून द्यावेत आणि निवड चाचणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यास सांगितले आहे. 

Web Title: Gail India Star Maharashtra venture to select talented players in schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.