सेंद्रिय भाजीपाला, धान्य विक्री केंद्र उघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:56 PM2018-09-02T12:56:39+5:302018-09-02T12:56:55+5:30

अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रचार करण्यावर शासनाचा भर असून, याच अनुषंगाने राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना केली आहे.

Organic vegetable, grain sale centers to open! | सेंद्रिय भाजीपाला, धान्य विक्री केंद्र उघडणार!

सेंद्रिय भाजीपाला, धान्य विक्री केंद्र उघडणार!

googlenewsNext

अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रचार करण्यावर शासनाचा भर असून, याच अनुषंगाने राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना केली आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या मिशन अंतर्गत सेंद्रिय शेतीसंदर्भात संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, शेतमाल विक्री केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होता अधिक वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकºयांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहेत. कृषी विद्यापीठात सेंद्रिय भाजीपाला, शेतमाल उत्पादन घेतले जात असून, शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरदेखील भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भारत सरकारच्या विभागीय सेंद्रिय शेती केंद्र नागपूरच्यावतीने विदर्भातील शेतकºयांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण देण्यात आले. सेंद्रिय पदार्थांना उपलब्ध असलेली आंतरराष्टÑीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादने, पदार्थांना मोठा वाव असल्याने राज्य शासनाने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले असून, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना करण्यात आली आहे. याचा प्रसार अधिक गतीने होण्यासाठी शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नसल्याने नव्याने सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे.

- डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनतंर्गत प्रयोगशाळा स्थापन करू न, सेंद्रिय शेतीला लागणारे विविध सेंद्रिय खतांचे उत्पादन, संशोधन करण्यात येणार आहे. तद्वतच भाजीपाला, शेतमाल विक्री करण्यासाठी कृषी विद्यापीठात दालन उघडले जाणार आहे.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. /> 

 

Web Title: Organic vegetable, grain sale centers to open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.