शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्त्या उघड्यावर; निर्माल्याचा खच

By admin | Updated: September 10, 2014 01:44 IST

गणेश विसर्जनानंतर मोर्णेची झाली दयनीय अवस्था.

अकोला: जिल्हय़ात मोठय़ा थाटामाटात गणेश उत्सव साजरा झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी वाजत-गाजत गणेश मूर्त्यांचे मोर्णा नदीत विसर्जन केले. मंगळवारी सकाळी मात्र विसर्जन स्थळावरील चित्र भयंकर होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असलेल्या मूर्त्या पाण्यात विरघळल्या नसून, नदीकाठी पडलेल्या आहेत. तसेच निर्माल्याचा खच साचला आहे. शहरात २१६ सार्वजनिक, तर हजारो घरगुती गणेश मूर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी सर्वांनीच गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले. गणेश मूर्त्यांंच्या विसर्जनाकरिता मनपाच्या वतीने तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. सिटी कोतवालीजवळ असलेल्या गणेश घाटावर मनपाने टाके बनविले असून, या ठिकाणी विसजिर्त केलेल्या मूर्त्या कर्मचारी त्वरित काढून ट्रकमध्ये भरून गांधीग्रामला विसजिर्त करीत होते. अन्य ठिकाणी मात्र भाविकांनी स्वत: नदीत गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले. वाशिम बायपासजवळील पुलाखाली भाविकांनी शेकडो गणेश मूर्त्यांंचे विसर्जन केले. या मूर्त्या मंगळवारी या ठिकाणी नदीच्या काठी पडलेल्या होत्या. तसेच नदीकिनारी निर्माल्याचा खच पडला होता. तसेच अनिकट भागात मोर्णा नदीतही भाविकांनी गणेश मूर्त्यांंचे विसर्जन केले. या ठिकाणीही मूर्त्या व निर्माल्य पडलेले होते. मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे पाण्यात विरघळत नाहीत. पाण्याच्या प्रवाहातून त्या बाजूला सारल्या जातात व नदीकिनारी पडतात. तसेच निर्माल्यही नदीकिनारी पडलेले आहे. ** पीओपीमुळे होतात असाध्य आजार गणेश मूर्तीला देण्यात येणार्‍या रंगांमध्ये मक्यरुरी, लीड या घातक रसायनांचा वापर केल्या जातो. यामुळे पाणी तर प्रदूषित होतेच सोबतच हे पाणी पिणार्‍या मनुष्य व प्राण्याला विविध आजारही होतात. मक्यरुरीमुळे लहान मुले गतिमंदही होऊ शक तात. दहा दिवस गणेशाची पूजा करण्याकरिता फूल व पुष्पमाळांचा उपयोग करण्यात येतो. दहा दिवसानंतर गणेश मूर्त्यांंच्या विसर्जनासोबतच हे निर्माल्यही पाण्यात विसजिर्त करण्यात येते. निर्माल्य पाण्यात सडते. त्यामुळेही पाणी दूषित होते.