शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसच्या धडकेने एक जण जागीच ठार

By admin | Updated: March 1, 2015 21:18 IST

अकोला तालुक्यातीन वणीरंभापूर जवळ अपघात.

वणीरंभापूर (जि. अकोला): मूर्तिजापूरहून अकोल्याकडे वेगाने जाणार्‍या एसटी बसने वणीरंभापूर फाट्यावर बसची वाट पाहत असलेल्या व्यक्तिला जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. वणीरंभापूर येथील विजय वानखडे यांच्या घरी १ मार्च रोजी त्यांच्या मुलीचा विवाहसमारंभ होता. या विवाहास उपस्थित राहण्यासाठी नवरदेवाचे मावसे असलेले अमरावती येथील अन्न व नागरी पुरवठा विभागात नायब तहसीलदार असलेले रघुनाथ वानखडे (५२) हे आले होते. लग्नसमारंभास उपस्थित राहिल्यानंतर वानखडे अमरावतीला जाण्यासाठी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास वणीरंभापूर फाट्यावर आले होते. अमरावतीला जाणार्‍या बसची वाट पाहत असताना मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जाणार्‍या एका एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रघुनाथ वानखडे हे जागीच ठार झाले. या अपघातानंतर एसटी बस तेथे न थांबता वेगाने निघून गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी व लग्नास उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी वणीरंभापूर फाट्यावर गतिरोधक बांधण्यात यावे, या मागणीसाठी तब्बल एक तासपर्यंत रास्तारोको आंदोलन केले. याबाबतची माहिती मिळताच बोरगाव मंजूचे ठाणेदार डी.के.आव्हाळे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकरी व मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घातली. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर पोलिसांनी वानखडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अकोल्यास पाठविला.