दोन अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 05:46 PM2021-01-10T17:46:16+5:302021-01-10T17:55:51+5:30

Murtijapur Accident News दोन अपघातांमध्ये एक जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

One killed, one seriously injured in two accidents | दोन अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

दोन अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देपरांडा येथील प्रकाश भिमला राठोड (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. कापूसतळणी येथील रहिवासी श्रीकांत दयाराम ढोके (४०) हे जखमी झाले.

 मूर्तिजापूर : मुर्तीजापूर येथे रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
             दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास परांडा तालुका बार्शीटाकळी येथील रहिवासी प्रकाश भिमला राठोड (५०) हे मूर्तिजापूर तालुक्यातील गौरखेडी येथून दशक्रियेचा कार्यक्रम आटोपून परांडा या आपल्या गावी दुचाकी क्रमांक एमएच ३० एयू ३१९३ ने परत जात असता येथील कंझरा टी पॉईंटवर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल. तर दुसऱ्या घटनेत अमरावती जिल्ह्य़ातील कापूसतळणी येथील रहिवासी श्रीकांत दयाराम ढोके (४०) हे बोरी अरब येथून एमएच २७ एजी ९७७१ या क्रमांकाच्या दुचाकीने गावी परत जात असताना दुपारी ४ वाजता कारंजा रोडवर किनखेड फाट्या जवळ त्यांच्या दुचाकी समोर अचानक रोही आडवा आल्याने दुचाकीसह रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वंचित बहूजन आपत्कालीन पथक व १०८ घटनास्थळी दाखल झाले. अमोल खंडारे, सेनापती शेवतकार, अक्षय सुर्यवंशी, स्वप्नील चौधरी, भूषण तिहिले यांच्या मदतीने मृतदेह व जखमीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

Web Title: One killed, one seriously injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.