शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हार्‍यात भांड्याचे दुकान फोडले

By admin | Updated: September 7, 2014 23:59 IST

३0 हजारांचा ऐवज लंपास : गस्तीवर प्रश्नचिन्ह

तेल्हारा : शहरात गत काही दिवसांपासून सुरू असलेले चोर्‍यांचे सत्र थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी येथील मुख्य मार्गावरील एक भांड्याचे दुकान फोडून ३0 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार, ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, येथील मुख्य मार्गावरील भावना स्टिल होम या भांड्याच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी शनिवारच्या रात्री डल्ला मारला. दुकानावरचे टीनपत्रे कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व १८ हजार रुपये किमतीच्या ३0 नग पितळी समई तसेच १२ हजार रुपये नगदी, असा एकूण ३0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारच्या भावना ड्रेसेस या कापडाच्या दुकानाचे टीनपत्रे कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. भावना स्टिल होमचे मालक शिवलाल हरिभाऊ फोकमारे यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरात गत काही दिवसांपासून चोर्‍यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी जयस्वाल यांच्या बीअर बारवर ४0 हजार रुपयांनी हात साफ केला होता. तर साई मोबाईल शॉपीमधून ४0 हजार रुपयांचा माल चोरला होता. त्यानंतर साक्षी नगरमधील गणेश बावस्कार यांच्या घरी चोरी झाली होती. गत काही दिवसांमधील चोरीची ही चौथी घटना आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.