शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

..आता लक्ष प्रक्रिया उद्येागावर !

By admin | Updated: November 19, 2016 02:03 IST

राज्यस्तरीय अँग्रोटेक कृषी प्रदर्शनात शेतक-यांना देणार नव तंत्रज्ञानाची मेजवानी.

अकोला, दि. १८- शेतकर्‍यांना सामाजिक,आर्थिकदृष्ट्या सबळ करायचे असेल तर त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणे व रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. हे विषय घेऊन २७ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय अँग्रोटेक कृषी प्रदर्शनात प्रात्यक्षिकासह शेतकर्‍यांचे प्रबोधन केले जाणार आहे. यासाठीची जय्यत तयारी आतापासूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केली आहे.देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८ व्या जयंतीचे औचित्य साधून कृषी विद्यापीठाच्या क्र ीडांगणावर २७ ते २९ डिसेंबर असे तीन दिवस कृषी प्रदर्शनाचे होत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, राज्य शासन, जिल्हा परिषद व संलग्न संस्थांच्या सहकार्याने अँग्रोटेक -१६ मध्ये शेतकर्‍यांना नव तंत्रज्ञानाची मेजवानी उपलब्ध करू न दिली जाणार आहे. या प्रदर्शनात विद्यापीठ शास्त्रज्ञांसोबत विविध विषयांवर दररोज चर्चासत्र घेतले जाणार आहेत. कृषी अवजारे, उत्पादने, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, ग्रामीण व्यवसाय उत्पादने, कृषी व ग्रामीण उद्योग, फळे व भाजीपाला उद्योग, कृषी संलग्नित योजना आदी दालने शेतकर्‍यांसाठी येथे असतील. विशेष म्हणजे बचत गटांचा सहभाग या प्रदर्शनात राहणार आहे. विद्यापीठांची प्रकाशने शेतकर्‍यांसाठी उपलब्ध असतील. यासाठीची कृषी विद्यापीठाने जय्यत तयारी केली आहे. प्रदर्शनाबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यावर्षीच्या राज्यस्तरीय अँग्रोटेक-२0१६ मध्ये कृषी प्रक्रिया उद्योग व रोजगार निर्मिती या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी परिसंवाद व प्रात्यक्षिक स्वरू पात शेतकर्‍यांचे प्रबोधन केले जाईल. विविध नव तंत्रज्ञानाची दालने येथे असतील.डॉ. प्रदीप इंगोले, संचालक,विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.