शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; वाहक मास्क घालून तर चालक विनामास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:10 AM

No masks, no social distance in Buses : अकोला - दिग्रस या बसमध्ये बार्शीटाकळीपर्यंत अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात बसमध्ये अनेक प्रवासी विनामास्क होते.

अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यात एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. अद्याप कोरोना संसर्गाचा धोका दूर झाला नाही. त्यामुळे एसटी बसमध्ये कोरोना संसर्गाची काय दक्षता घेतली जाते. हे ‘लोकमत’कडून बुधवारी पडताळण्यात आले. त्यावेळी अकोला - दिग्रस या बसमध्ये बार्शीटाकळीपर्यंत अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात बसमध्ये अनेक प्रवासी विनामास्क होते. वाहकाने मास्क घातला होता. मात्र, चालकाने एकदाही मास्क वापरला नसल्याचे आढळून आले.

राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांच्या उपचारावर लाखो रुपये खर्च करावे लागले, तर अनेक जण अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आले. आता ही लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. यासाठी जनतेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एसटीच्या प्रवासात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रत्यक्षात अनेक प्रवासी मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची दक्षता घेत नसल्याचे, तसेच चालक, वाहकही विनामास्क कर्तव्य बजावत असल्याचे अनेक बसमध्ये दिसून येत आहे. याबाबत अकोला - दिग्रस बसमध्ये पडताळणी केली असता चालक विनामास्क होते, तर वाहकाने मास्क घातला असल्याचे आढळून आले.

 

प्रवासादरम्यान चालकाच्या तोंडावर मास्कच नाही!

चालक

अकोला - दिग्रस या बसच्या चालकाने अकोला - बार्शीटाकळी या अर्ध्या तासाच्या प्रवासात एकदाही मास्क लावला नाही, तसेच केबिनमध्ये त्याच्या शेजारी एक प्रवासी विनामास्क बसला होता.

वाहक

एसटीच्या प्रवासात कोरोना संसर्गाची सर्वाधिक खबरदारी बाळगण्याचे काम वाहकाला करावे लागते. या प्रवासात बसमध्ये चढताना चालकाचा मास्क नाकाखाली होता व तिकीट काढताना पूर्ण मास्क घातला होता.

कुठल्या बसथांब्यावर किती चढले-उतरले!

अकोला

सकाळी १०.३० वाजता येथील आगार क्रमांक २ मधून दिग्रसकरिता एसटी बस सुटल्यानंतर या बसमध्ये २९ प्रवासी बसले होते. दरम्यान, एसटी वर्कशॉपजवळ एक प्रवासी बसला, तर पुढे कौलखेड चौकात आणखी दोन प्रवासी बसले. बस थोड्या अंतरावर जात नाही तोच आणखी एक प्रवासी बसमध्ये बसला.

बार्शीटाकळी

सव्वा अकराच्या दरम्यान ही बस बार्शीटाकळी येथे पोहोचली. यावेळी आठ प्रवासी उतरले. काही प्रवासी चढले. या प्रवासात निम्म्यापेक्षा अधिक प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाहीत. एक प्रवासी तर चक्क चालकाच्या बाजूला विनामास्क बसला होता.

 

‘लोकमत’चा एसटी प्रवास

बस

अकोला-दिग्रस

वेळ

सकाळी १०.३०

प्रवासी

३३

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीBarshitakliबार्शिटाकळी