शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकही यंत्र नसलेल्या, अनुभवशून्य कंत्राटदाराची निवड!

By admin | Updated: May 9, 2017 02:57 IST

जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यांशिवाय दिली मंजुरी

सदानंद सिरसाट । अकोला : जिल्हाभरात जलयुक्त शिवारची हजारो कामे असताना त्यासाठी कोणताही अनुभव गाठीशी नसलेल्या तसेच निविदेनुसार आवश्यक कोणतेही यंत्र मालकीचे किंवा भाड्याने घेतल्याची कागदपत्रे न देताच साई एंटरप्रायजेसच्या पवनेश रमेशचंद्र अग्रवाल यांना जिल्हाभरातील शेकडो कामांचे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती सदस्यांची मंजुरीही घेतली नसल्याचे पुढे आले आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ह्यसर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र-२0१९ह्ण हा शासनाचा महत्त्वांकाक्षी उपक्रम डिसेंबर २0१४ पासून सुरू झाला. त्यासाठी शासनाने ५ डिसेंबर २0१४ रोजीच्या शासन निर्णयात सविस्तर आदेश दिला आहे. त्या निर्णयातच जिल्हास्तरीय समितीचे अधिकार आणि कामेही निश्‍चित केलेली आहेत. मात्र, अकोला जिल्ह्यात जेसीबी मशीनद्वारे कामे करताना त्या निर्णयातील आदेशांचे उल्लंघन करत प्रक्रिया राबवण्यात आली. निर्णयातील मुद्दा क्रमांक १४ नुसार जिल्हा नियोजन व विकास समितीकडे उपलब्ध निधीचा वापर करून नावीन्यपूर्ण योजना राबवता येते. त्यामध्ये जेसीबी मशीनचा वापर करून नाल्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रुंदीकरण करणे, ही कामे घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. मात्र, त्याचवेळी कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला देण्यात आले. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातून ही कामे करताना जेसीबी यंत्र पुरवठादार नियुक्तीसाठी जिल्हास्तरीय समितीची मंजुरी असणे आवश्यक आहे. शासन निर्णयातील आदेश डावलून जिल्हास्तरीय समिती सदस्य म्हणून केवळ दोन अधिकार्‍यांनीच निविदा प्रक्रिया, त्यातील अटी व शर्ती, करारनामा, कामांच्या दराला मंजुरी दिल्याचे उघड होत आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि त्यांच्या आदेशाने निविदा प्रक्रिया राबवणारी यंत्रणा म्हणून रोजगार हमी योजना विभागाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी म्हणतात.. तक्रार आल्यास कारवाईनिविदा प्रक्रियेतील करारनाम्याची मुदत १६ मे २0१७ रोजी संपत आहे. या काळात कोणीही तक्रार केली नाही, त्यामुळे आता कोणी तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल, असे नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. मात्र, यंत्र पुरवठय़ातील दिरंगाईबाबत कनिष्ठ महसूल अधिकारी जिल्हाधिकार्‍यांकडे कशी तक्रार करणार, ही बाब अडचणीची ठरणार आहे. पंधरा सदस्यांची समिती गेली कोठे?जलयुक्त शिवार उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने निर्णयानुसार पंधरा सदस्यांची समिती गठित केली आहे. त्यापैकी कोणत्याही अधिकार्‍याच्या स्वाक्षरीने ही निविदा प्रक्रिया, त्यातील पुढील प्रक्रियेला मंजुरी नसल्याचे उघड सत्य आहे.