Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:16 PM2019-05-13T12:16:07+5:302019-05-13T12:24:27+5:30

खेट्री: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही.

No logbook in tanker; given in oral information to Sarpanch | Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती

Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती

googlenewsNext

- नासीर शेख
खेट्री (ता. पातूर): पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही. तसेच या गावांमध्ये येणाऱ्या टँकरचालकाकडे खेपांची नोंद करण्यासाठी असलेले लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या खेपांची अनियमितता होण्याची शक्यता नाकारता येत नाही
पातूर पंचायत समितीकडून तालुक्यातील उमरा, सुकळी, पिंपळखुटा या तीन गावांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही गावांना २४ हजार लीटरच्या प्रत्येकी १ टँकरद्वारे ९ मेपासून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पिंपळखुटा गावात पहिल्याच दिवशी टँकर रस्ता अरुंद असल्याचे कारण देत चालकाने टँकर परत नेला. शेतातील अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी आणून गावातील विहिरींमध्ये टाकून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु मोठ्या लोकसंख्येला हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या टँकरवर अधिकाºयाऐवजी ग्रामपंचायत शिपाई नियंत्रण ठेवत असल्याचे दोन्ही गावांमध्ये आढळून आले. पाणी मिळाल्याची नोंद लॉगबुकमध्ये करणे गरजेचे आहे; मात्र या ठिकाणी लॉगबुकच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. विहिरीमध्ये पाणी टाकण्याची माहिती सरपंचाला तोंडी दिली जाते, असे टँकरचालकांनी सांगितले. दोन्ही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असल्याचेही दिसून आले; परंतु त्यावर नियंत्रण कुणाचे, हे चालकालाही ठाऊक नव्हते.

ब्लिचिंग पावडरचा वापर नाही
टँकरद्वारे आणलेले पाणी ज्या विहिरींमध्ये टाकल्या जाते, त्या विहिरी स्वच्छ दिसून आल्या; परंतु या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नसल्याचे वास्तव आहे.

टँकरची एकच फेरी
उमरा व सुकळी या गावांमध्ये दिवसातून एक वेळ टँकर येतो. टँकरमुळे पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तर टँकरच्या दोना फेºया केल्यास पाणीटंचाईची समस्या दूर होऊ शकते, अशी मागणी होत आहे.

विद्युत पुरवठा खंडित असल्याचा फटका
परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणी भरण्यासाठी टँकर तासन्तास ताटकळत उभा करावा लागत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. याकडे वीज वितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

टँकरची एकच फेरी होत असल्यामुळे पाणी पुरवठा अपुरा होत आहे. टँकरच्या दोन फेºया केल्यास पाणीटंचाई दूर होऊ शकते. 
- नारायण रामदास हरमकार, ग्रामस्थ, उमरा.
 
गावाला एक टँकर मिळाला असून, काही प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली आहे. दोन टँकरने पाणी पुरवठा केल्यास पूर्ण पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.
काशीराम हिवराळे मा. सरपंच.
 
पिंपळखुटा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर आला होता; परंतु रस्ता अरुंद असल्यामुळे चालकांनी टँकर परत नेला. पंचायत समितीकडून दुसरा टँकर आज मिळणार आहे.
- सुनीता रवींद्र शेलार, सरपंच, पिंपळखुटा.

 

Web Title: No logbook in tanker; given in oral information to Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.