शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

नायडूंच्या उमेदवारीचे अकोल्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:44 IST

अकोला: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपा व घटक पक्षाने व्यंकया नायडू यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारीचे अकोल्यात भाजपाच्या वतिने स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपा व घटक पक्षाने व्यंकया नायडू यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारीचे अकोल्यात भाजपाच्या वतिने स्वागत करण्यात आले. भाजपा कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून व फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला.जनसंघ ते भाजपा पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत, विद्यार्थी परिषदेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व २५ वर्षांचा संसदीय कामकाजाचा अनुभव असणारे एम. व्यंकय्या नायडू यांची निवड करू न सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केल्याची तसेच शहरी व ग्रामीण विकासाचा अनुभव असणारे ज्येष्ठ सहकारी यांची निवड हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय धोत्रे यांनी दिली. तर उत्तर ते दक्षिण जोडणारा निर्णय राष्ट्रपती व उपराष्ट्रपती उमेदवार निश्चित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना न्याय देण्याची भूमिका तसेच भैरवसिंह शेखावत यांच्यानंतर उपराष्ट्रपती बनण्याचा मान संघ स्वयंसेवकाला मिळाल्याचा आनंद असल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगितले. आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, शेतकरी परिवारातील, ओबीसी तसेच दक्षिण भारतातून जे.पी.आंदोलनाशी जुळणारे, दोन वेळा भाजपाची राष्ट्रीय नेतृत्व करणारे व पक्षासाठी अहोरात्र १९७० पासून संघर्षशील नेते व्यंकय्या नायडू यांच्या निवडीने आनंद होत आहे. उच्चशिक्षित राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्हीही कायदेतज्ज्ञ असल्यामुळे देशाला नवीन दिशेकडे नेतील. संघटना व विचारधारेसोबत संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणारे तसेच सभागृहातील अनुभव व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला अवगत असलेल्या व्यक्तिमत्त्वाची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी करू न जनतेमध्ये विश्वास निर्माण केल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी व्यक्त केली.