फेसबुकवर मैत्री झालेल्या नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर अकोल्यात कारमध्ये बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:50 IST2018-05-03T15:50:47+5:302018-05-03T15:50:47+5:30
अकोला - नागपूर येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मैत्री करून तिला अकोल्यात बोलावून या मुलीवर कारमध्येच दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उधडकीस आली.

फेसबुकवर मैत्री झालेल्या नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर अकोल्यात कारमध्ये बलात्कार
अकोला - नागपूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मैत्री करून तिला अकोल्यात बोलावून या मुलीवर कारमध्येच दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उधडकीस आली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर १४ एप्रिल रोजी वाशिम बायपास परिसरात बलात्कार करण्यात आला होता. मात्र गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
सै. आकीब सै. युसुबअली व अफरोज (दोघेही मेहकर जि बुलढाणा.) असे आरोपिचे नावे आहेत. सै आकिब याची नागपुर येथील मुलीशी फेसबुकवर ओळख झाली, १४ एप्रिल रोजी मुलगी तिच्या नातेवाईककडे अकोला येथे आली असताना आरोपींनी तिला म्हटले की तुला माझे आईवडील पाहण्यासाठी आले आहेत, ते आपले लग्न करून देतात, असे म्हणून स्कारपीओ गाडीत बसवून, वाशीम बायपास येथे आणले, वाहनताच आरोपीने तिचा विनयभंग केला व लैंगिक अत्याचार करून, फोनवरून, पैशाची मागणी केली व बदनामी करण्याची धमकी दिली. मुलीने तिच्या आईवडीलाना आपबीती संगीतल्या नंतर त्यांनी जुने शहर पोलिस ठाणे गाठले व आरोपी विरुद्ध तक्रार दिली पोलिसानी त्यावरून कलम 354 ड, 376, 384, 507, सह कलम बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कलम (पोस्को) 12,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.