शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:04 IST

२१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुरखेड मतदान केंद्र क्रमांक १९० वरील मतदान न मोजताच निकाल जाहीर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, निकाल रद्द न झाल्यास न्यायालयात याचिका टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये झालेल्या गैरप्रकारासंदर्भात सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पातोडे म्हणाले की, २१ आॅक्टोबर रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ३८१ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी १ लाख ७४ हजार ७९९ मतदान झाल्याचा आकडा प्रशासनाने दिला होता. त्यामध्ये तुरखेड येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक १९० येथे एकूण २१० म्हणजेच ५२.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट केले होते; परंतु २४ आॅक्टोबर रोजी मत मोजणीमध्ये १ लाख ७४ हजार ५८९ मतांचा आकडा जाहीर करण्यात आला. एकूण झालेले मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतदानात २१० मतांची तफावत आहे.मतमोजणीनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये केंद्र क्रमांक १९० चा ‘फॉर्म क्रमांक १७ सी’ नव्हता, तर मतमोजणीच्या दिवशी तयार करण्यात आलेल्या फॉर्म क्रमांक २० मध्ये तुरखेड येथील मतदान केंद्र क्र. १९० वरील आकडेवारी शून्य दाखविण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. म्हणजेच तुरखेड मतदान केंद्रावर झालेल्या २१० मतांची मोजणी न करताच प्रशासनाने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करून भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांना विजयी घोषित केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला.मतमोजणीची पूर्ण प्रक्रिया न करताच निकाल जाहीर केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीचा निकाल रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी. तसेच दोषपूर्ण प्रक्रिया राबविणाºया जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट उपस्थित होते.‘एसडीओ’ म्हणतात...!मूर्तिजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सदर आरोप खोडून काढला. ते म्हणाले की, विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्या विजयादरम्यानच्या मतांमध्ये १,९१० मतांचा फरक आहे. तुरखेड येथील मतदान केंद्र क्रमांक १९० मध्ये मतदान पार्टीने सीआरसी केली नाही. तेथील मतदान मशीनमध्ये २६१ मते निघाली. अर्थात तेथे २१0 असे प्रत्यक्ष मतदान झाले आणि मॉकपोलचे ५१ असे एकूण २६१ मतदान करण्यात आले. दोन उमेदवाराच्या १,९१० मतांचा फरक असल्याने त्या केंद्रावरील मतमोजणी करणे आवश्यक नाही, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. जर १००-२०० मतांचा फरक असता तर ती मते ग्राह्य धरल्या गेली असती. २१० मते कुठल्याही उमेदवाराकडे वळविली तरी निकालावर फरक पडणार नाही. आम्ही त्यावेळी जी भूमिका घेतली ती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार घेतली आहे. ज्या मतदान पार्टीने सीआरसी केली नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, या संदर्भात त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmurtizapur-acमूर्तिजापूर