शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरचे बीडीओ अडचणीत

By admin | Updated: February 4, 2015 01:40 IST

योजनांमधील भ्रष्टाचार भोवणार; सभापतींची तक्रार.

अकोला- मूर्तिजापूरचे गटविकास अधिकारी के. बी. श्रीवास्तव पुन्हा अडचणीत आले आहेत. यापूर्वी वृक्ष लागवडीच्या प्रकरणात कारवाईला सामोरे जाणारे बीडीओ आता भ्रष्टाचार आणि शासकीय संपत्तीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. पंचायत समिती सभापतींनी केलेल्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांनी बीडीओवर कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे ३0 जानेवारी रोजी केली. सिंचन विहिरीच्या कामांचे प्रस्ताव, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची दिशाभूल करणे, इंदिरा आवास व रमाई आवास योजनेचा निधी बँकेत ठेवताना शासनाचे निर्देश डावलणे आदी आरोप मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापती शुभांगी खंडारे यांनी २७ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केले होते. या तक्रारीतच बीडीओंकडून शासकीय योजना राबविल्या जात नसल्याचा आरोपही सभापतींनी केला. बीडीओ शासकीय वाहनाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी केला आहे. सभापतींनी केलेल्या या सर्व आरोपांची चौकशी करून उचित कारवाई करण्याची शिफारस पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे. दरम्यान के बी श्रीवास्तव यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सभापतींच्या सर्वच मागण्या नियमानुसार मान्य करणे शक्य होत नसल्याने बरेचदा पदाधिकार्‍यांकडून योजनांचा निधी एका योजनेकडून दुसर्‍या योजनेकडे वळता करण्यासाठी दबाव येत असल्याचे सांगून त्यामुळेच आरोप झाला असल्याचे त्यांनी सांगीतले.