शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने भुसावळ जंक्शनला केले बायपास;  प्रवाशांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:19 PM

अकोला : मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे.

अकोला : मुंबई-दिल्ली मार्गावर शनिवारपासून नव्याने सुरू झालेल्या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांची घोर निराशा केली आहे. प्रत्येक आठवड्यातील शनिवार आणि बुधवारी दोन दिवस धावणाऱ्या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे.शनिवार, १९ जानेवारीपासून मुंबई-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू झाली. दिल्लीकडे धावणारी एक रेल्वे मिळत असल्याचा आनंद भुसावळ विभागातील अकोल्यापर्यंत होता; मात्र जेव्हा या रेल्वेगाडीचे वेळापत्रक आले, तेव्हा स्पष्ट झाले, की ही गाडी जळगावहून पुढे वळणार आहे. भुसावळलादेखील या गाडीला प्रवेश नसल्याने प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. राजधानीने भुसावळ जंक्शन रेल्वे स्टेशनलाच बायपास केल्याने प्रवाशांनी टीका सुरू केली आहे. २२२२१ क्रमांकाची डाउन मार्गे धावणारी मुंबई-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस १९ जानेवारी दुपारी २.५० वाजता निघाली. आठवड्यातील प्रत्येक बुधवार आणि शनिवारी ती धावणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, बिना, झाशी, आग्रा कॅन्ट, पळवल या स्टेशनवर थांबा असेल. नव्याने सुरू झालेल्या या राजधानी एक्स्प्रेसला किमान भुसावळ मार्गे तरी वळविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेBhusawalभुसावळRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस