शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

शुक्रवारपासून मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:55 PM

Mumbai-Nagpur Duranto Express विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनेमुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया एक्स्प्रेस या दोन विशेष रेल्वेगाड्यांसह पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, ९ व १० ऑक्टोबरपासून या गाड्या सुरु होणार असून, या गाड्या पूर्णपणे आरक्षीत असून, ८ आॅक्टोबर पासून आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.आगामी सणा-सुदीचे दिवस लक्षात घेता मध्य रेल्वेने नऊ आॅक्टोबरपासून पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया , डेक्कन क्वीन, इंद्रायणी आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.गाड़ी क्रमांक ०२१९० अप मुंबई ते नागपूर दुरंतो ही विशेष गाडी ९ आॅक्टोबर पासून नागपूर रेल्वेस्थानक येथून दररोज रात्री ८. २० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. गाड़ी क्रमांक ०२१८९ डाउन मुंबई ते नागपुर दुरंतो ही विशेष गाडी १०आॅक्टोबर पासून मुंबई स्टेशन येथून दररोज रात्री ८.१५ वाजता रवाना होऊन दिवशी सकाळी ७.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल. या गाडीला फक्त भूसावळ येथे पाच मिनिटांचा थांबा असणार आहे.गाड़ी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई - गोंदिया ही विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सायंकाळी ७.०५ वाजता मुंबई स्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ११.२० वाजता गोंदिया स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज पहाटे ४.१५ वाजता अकोला स्थानकावर येईल. गाड़ी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया ते मुंबई ही विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज दुपारी ३ वाजता गोंदीया रेल्वेस्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज रात्री ८.५५ वाजता अकोला स्थानकावर येईल.या गाड्यांना नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर,बडनेरा स्थानकावंर थांबा असणार आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेnagpurनागपूरMumbaiमुंबईAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक