शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

महावितरण : आॅनलाइन वीज बिल भरण्यासाठी माफक सेवा शुल्क

By atul.jaiswal | Published: February 08, 2018 1:53 PM

अकोला : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे कधीही व कुठूनही आॅनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा करता येऊ शकतो. या सुविधेसाठी सेवा शुल्क अत्यंत माफक आहेत. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.नेटबँकिंगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीज देयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही.

अकोला : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे कधीही व कुठूनही आॅनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा करता येऊ शकतो. सदर पद्धतीमध्ये वीज ग्राहक त्यांच्या वीज देयकाचा भरणा क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यूपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतो. या सुविधेसाठी सेवा शुल्क अत्यंत माफक आहेत. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.आॅनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पद्धतीस आरबीआयच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. आॅनलाइनने वीज देयक भरणा केल्यास ग्राहकांना त्वरित एसएमएस व भरणा पावती दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे ३० लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असून, यातून दरमहा महावितरणला आॅनलाइन वीज बिल भरणा पद्धतीद्वारे साधारणत: ६०० कोटी रुपयांची महसुलाची प्राप्ती होते. आॅनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करण्याबाबत काही अडचणी असल्यास व त्यासंदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केला असून, या ठिकाणी संपर्क केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी महावितरणचे मोबाइल अ‍ॅप व संकेतस्थळामार्फत आॅनलाइनद्वारेच वीज बिल भरावे व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.इतर राज्यांच्या तुलनेत कमी सुविधा शुल्कअशा प्रकारच्या देयक भरणा प्रणालीमध्ये मास्टर, व्हिजासारख्या संस्था क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत देयक अदा करण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात. या बाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत माफक व वाजवी आहेत. इतर राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत कमी आहेत.रुपये ५०० पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क नाही!महावितरणच्या ग्राहकाने क्रेडिट, डेबिट कार्ड, यूपीआयमार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये ५०० पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. तसेच नेटबँकिंगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीज देयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही. या दोन्हीही पर्यांयांसाठीच्या सुविधा शुल्काचा भरणा महावितरणमार्फत करण्यात येतो.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण