दोन मुलांना सोडून विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:28 IST2020-09-18T18:28:21+5:302020-09-18T18:28:28+5:30
नात्याने मावस दीर असलेल्या प्रियकरासोबत पलायन करून नव्याने संसार थाटला आहे.

दोन मुलांना सोडून विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन
विझोरा : प्रेम आंधळ असतं. प्रेमासाठी अनेक जण वाट्टेल ते करायला तयार होतात. असेच एक प्रेमप्रकरण १७ सप्टेंबर रोजी समोर आले. पोटच्या दोन मुलांची चिंता न करता, एका ३0 वर्षीय विवाहितेने नात्याने मावस दीर असलेल्या प्रियकरासोबत पलायन करून नव्याने संसार थाटला आहे. याप्रकरणी पतीने पोलिसात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना कारवाई करता आली नाही.
बार्शीकळी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या येळवण येथे दोन मावस भाऊ शेजारी राहतात. गत एक वर्षापूर्वी मावस भावाचे दुसऱ्या मावस भावाच्या पत्नीसोबत सूत जुळले. याची कुणकुण पतीला लागली. अनेक वेळा या दोघांना मोबाइलवर बोलताना तिच्या पतीने पाहिले. त्याने दोघांचीही समजूत घातली; परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर आपल्या दोन मुलांना वाºयावर सोडून विवाहितेने प्रियकरासोबत पलायन केले. याप्रकरणी पतीने बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, प्रेमीयुगुलाने पोलीस ठाण्यात हजेरी लावत, आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही विवाह करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. दोघांची सहमती असल्यामुळे पोलिसांनाही कारवाई करता आली नाही. सध्या या प्रेमप्रकरणाची परिसरात खमंग चर्चा रंगली आहे.