मुलीचा विनयभंग; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:47 IST2019-01-05T12:46:45+5:302019-01-05T12:47:12+5:30

अकोला: घराजवळच राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री करून तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिला त्रास देणाºया अल्पवयीन मुलाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.

 Molestation of girl; Filed a complaint | मुलीचा विनयभंग; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीचा विनयभंग; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला: घराजवळच राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री करून तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिला त्रास देणाºया अल्पवयीन मुलाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
लहान उमरी परिसरातील १६ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घराजवळ राहणाºया १७ वर्षीय मुलाने तिच्यासोबत मैत्री करून तिचे काही फोटो काढले. या फोटोच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करायचा आणि तिला बोलवायचा. शुक्रवारी तिला तो बळजबरीने कृषी विद्यापीठ परिसरात घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने अग्रसेन चौकातील माउंट कारमेल शाळेजवळ आणले. याठिकाणी तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत असल्याने, मुलीने ही बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर मुलीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात या मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी मुलाविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

 

Web Title:  Molestation of girl; Filed a complaint