शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

सत्ता मिळवून देणाऱ्या साधनांवर मोदी, शहांचा ताबा - कुमार केतकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 2:13 PM

अकोला : मोदी म्हणजे भाजप नव्हे, या वास्तवाची जाण असलेल्या मोदी, शहा या जोडगोळीने येत्या काळात सत्ता मिळवून देणाºया साधनांवरच कब्जा केला आहे. प्रधानमंत्री पदासाठी पर्यायाचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करू नये, त्यासाठी ही साधने वापरली जात आहेत. मिलिटरी, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँकेला कह्यात घेतले आहे, मीडिया दहशतीत आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत लोकशाही कुठेच बसत नाही. त्यातच त्यांच्या नीतीमुळे देश विघटनाचा धोका निर्माण होत आहे, असा इशारा राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी येथे दिला.

ठळक मुद्देप्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित व्याख्यानात ‘भारतासमोरील २०१९ नंतरची आव्हाने’ या विषयावर खासदार केतकर यांनी विचार व्यक्त केले. दोघांनीही सत्ता मिळवण्याची साधने वापरण्याचा सपाटा लावला आहे. त्या साधनांचा वापर चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचेही केतकर म्हणाले.काश्मीरचा तुकडा धर्माच्या आधारे वेगळा केल्यास अमेरिकेला लष्करी तळ उभारण्याची सोय आपल्याच हातून होईल, हा धोकाही त्यांनी सांगितला.

अकोला : मोदी म्हणजे भाजप नव्हे, या वास्तवाची जाण असलेल्या मोदी, शहा या जोडगोळीने येत्या काळात सत्ता मिळवून देणाºया साधनांवरच कब्जा केला आहे. प्रधानमंत्री पदासाठी पर्यायाचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करू नये, त्यासाठी ही साधने वापरली जात आहेत. मिलिटरी, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँकेला कह्यात घेतले आहे, मीडिया दहशतीत आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत लोकशाही कुठेच बसत नाही. त्यातच त्यांच्या नीतीमुळे देश विघटनाचा धोका निर्माण होत आहे, असा इशारा राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी येथे दिला.शेतकरी जागर मंचच्यावतीने प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित व्याख्यानात ‘भारतासमोरील २०१९ नंतरची आव्हाने’ या विषयावर खासदार केतकर यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी गोरेगाव येथील शेतकरी तेजराव भाकरे, तर अतिथी म्हणून माजी खासदार नाना पटोले उपस्थित होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघाने निमंत्रित करून कार्यक्रमात सहभागी केले. संघाने मोदीला पर्यायाचा शोध सुरू केल्याचे ते चिन्ह आहे. त्याबाबत मोदी, शहा दोघांनीही मौन बाळगले. त्यातून मिळालेल्या संकेतामुळे या दोघांनीही सत्ता मिळवण्याची साधने वापरण्याचा सपाटा लावला आहे. त्या साधनांचा वापर चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचेही केतकर म्हणाले.२०१९ नंतर भारताची लोकशाही, स्वायत्तता टिकेल का, हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत काश्मिरची परिस्थिती स्फोटक पद्धतीने हाताळली जात आहे. त्यातून धर्माच्या आधारे काश्मीर मुस्लिमांचे, लडाख बौद्धांचे, तर जम्मू हिंदूंचे, असे राज्य निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. तसे झाल्यास देश विघटनाच्या मार्गावर जाईल. मिझोराम, नागालँड, मणिपूर, दक्षिणेत द्रविडी ही राज्यं इतर धर्मांच्या आधारे वेगळे होण्यास वेळ लागणार नाही. हा प्रकार सार्वभौम भारताला परवडणारा नाही. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी, सैन्य प्रमुख काश्मीरला भारतापासून वेगळे होण्यासाठी प्रवृत्त करणारी भाषा बोलतात. काश्मिरी जनतेला सांभाळून घेण्याऐवजी त्यांच्या मानवी मूल्यांचे हनन केले जाते. त्यांना बंदूक आणि पॅलेट गनची धमकी दिली जाते. हे वास्तवही केतकर यांनी मांडले. जागतिक परिघावर त्याचे भयंकर परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. काश्मीरचा तुकडा धर्माच्या आधारे वेगळा केल्यास अमेरिकेला लष्करी तळ उभारण्याची सोय आपल्याच हातून होईल, हा धोकाही त्यांनी सांगितला. प्रास्ताविक प्रशांत गावंडे यांनी, तर आभार जगदीश मुरुमकार यांनी मानले.

 संस्था ताब्यात घेऊन हिंदूकरणदेशाचे हिंदूकरण होईल, हे प्रत्यक्षात दृष्टीस पडणार नाही. मात्र, त्याचवेळी ज्या संस्थांतून देशाचे नेतृत्व तयार होते. विकासावर परिणाम होतो. त्या संस्था ताब्यात घेऊन त्यांचे हिंदूकरण केले जात आहे. नियोजन आयोग बरखास्त करणे, जेएनयूचे व्यवस्थापन मोडकळीस आणणे, यूजीसीचे नियंत्रण संपवणे, यासारखे प्रकार हिंदुत्व प्रस्थापित करण्यासाठी केले जात आहेत. सोबतच अलिप्ततावादी १५९ राष्ट्रांच्या समूहातून बाहेर पडण्याची मोठी चूक प्रधानमंत्री मोदींनी केली आहे. त्यामुळे तिसºया महासत्तेत प्रमुख असलेला भारत आता अमेरिकेपुढे दुर्बल ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह