शिवर येथील जुगारावर धाड, एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई 

By सचिन राऊत | Updated: September 25, 2022 18:38 IST2022-09-25T18:37:07+5:302022-09-25T18:38:10+5:30

शिवर येथील जुगाडावर एमआयडीसी पोलिसांमी कारवाई केली आहे. 

MIDC Police has taken action on speculative at Shiwar in akola | शिवर येथील जुगारावर धाड, एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई 

शिवर येथील जुगारावर धाड, एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई 

अकोला : एमआयडीसीपोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर एमआयडीसीपोलिसांनी रविवारी सकाळी धाड टाकली या ठिकाणावरुन दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून रोखरकमेसह १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवर येथे एका घरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहीती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन ठाणेदार किशोर वानखडे यांच्या गुन्हे शोध पथकाने शिवर येथे छापा टाकून चेतन काशीनाथ जाधव व शंकर काशीनाथ जाधव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोखरक्कम व मुद्देमाल १० हजार रुपये जप्त करण्यात आले या प्रकरणी दोन भावांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाइ एमआयडीसी पोलिसांनी केली. 


 

Web Title: MIDC Police has taken action on speculative at Shiwar in akola