विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 07:52 IST2026-04-13T07:49:33+5:302026-04-13T07:52:15+5:30
Weather News: काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरले.

विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
अकोला - काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरले. त्या पाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरांतही पारा चांगलाच वाढला होता. थंड हवेचे ठिकाण बुलढाण्याचे तापमानही ४० अंशाच्या पार गेले आहे. हवामान खात्याने पुढील ८ ते १० दिवस वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून उन्हाच्या झळा बसणार आहेत.
विदर्भातील तापमान
अकोला ४३.१०
अमरावती ४२.४०
वर्धा ४२.००
वाशिम ४१.६०
नागपूर ४१.४०
चंद्रपूर ४१.००
गडचिरोली ४१.००
बुलढाणा ४०.६०
गोंदिया ४०.५०
यवतमाळ ४०.२०
भंडारा ४०.००
ब्रह्मपुरी ३९.६०