शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

समिती गठणासाठी सदस्यच सापडेना!

By admin | Updated: January 6, 2015 01:33 IST

होर्डिंग्ज समितीसाठी अकोला मनपाची शोध मोहीम.

अकोला : शहरात अनधिकृत होर्डिंग्जला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने आयुक्तांच्या देखरेखीत शहर समिती व क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या स्तरावर झोननिहाय समितीचे गठण करण्याचा निर्णय घेतला. याकरिता अकोलेकरांना आवाहन करण्यात आले होते; परंतु एक महिना उलटून गेल्यानंतरदेखील मनपाला एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची बिकट परिस्थिती समोर आली. समिती गठणासाठी प्रशासनाला सदस्य सापडत नसल्याने इच्छुक सदस्यांची शोध मोहीम घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अनधिकृत होर्डिंंग्ज हटवण्याची कारवाई केली होती. यामध्ये प्रशासनाने गांधी रोड ते तहसील कार्यालय मार्गावरील दुकानांचे नामफलक काढण्याच्या मुद्यावर वादंग निर्माण झाले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता, कारवाई केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला होता. त्यानंतर उपायुक्त चिंचोलीकर यांनी होर्डिंग्ज हटविण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार शहर समिती व झोन स्तरावरील समिती गठणासाठी पुढाकार घेतला. यामध्ये झोन समितीसाठी संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या स्तरावर समितीचे गठन करण्याचे निर्देश आहेत. याकरिता प्रशासनाने इच्छुक अकोलेकरांना समितीमध्ये सदस्य होण्यासाठी आवाहन केले होते. अकोलेकरांनी मात्र या विषयाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. एक महिना उलटून गेल्यावरदेखील मनपाकडे एकही अर्ज सादर झाला नसल्याची माहिती आहे. यामुळे क्षेत्रीय अधिकार्‍यांवर इच्छुक सदस्यांची शोध मोहीम घेण्याची वेळ आली आहे. आता अधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.*कोण असेल शहर समितीमध्ये?शहर समितीमध्ये मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी व झोननिहाय समितीमार्फत आलेल्या सदस्यांचा समावेश राहील. शहर समितीची बैठक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनानंतर दुपारी १२ वाजता घेतली जाईल. समिती गठित न झाल्यामुळे बैठकही लांबणीवर गेली आहे.