शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ, सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: November 13, 2014 01:17 IST

उच्चशिक्षित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल.

अकोला : उच्चशिक्षित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकासह त्याची आई व वहिनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. नवविवाहिता दीपाली पुनीत कुलट हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह पोलिस खात्यातील सहायक पोलिस निरीक्षक पुनीत कुलट यांच्यासोबत ३0 मे २0१३ रोजी पार पडला. लग्नसमारंभामध्ये माहेरकडून कुलट यांना सोन्याच्या दागिन्यांसह हुंड्याच्या स्वरूपात मोठी रोख रक्कम देण्यात आली होती. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर पुनीत कुलट, त्यांची आई मीरा व वहिनी जया यांनी दीपाली हिला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. परंतु, दीपाली त्यांची मागणी पूर्ण करीत नसल्याने त्यांनी दीपालीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दीपाली हिने सासरच्यांचा छळ निमूटपणे सहन केला. परंतु, सासरकडील मंडळीकडून दीपालीचा अतोनात छळ होऊ लागल्याने तिने अखेर सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती पुनीत, सासू मीरा व वहिनी जया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला. कुलट हे दहशतवादी विरोधी पथकात (एटीएस) सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.