वादळी वार्याने अनेकांची घरे क्षतिग्रस्त
By Admin | Updated: June 3, 2014 01:53 IST2014-06-02T22:19:42+5:302014-06-03T01:53:23+5:30
मुंडगाव: अकोट तालुक्यातील मंुडगाव परिसरात २ जून रोजी वादळी वारा व पावसामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली असून, संसार उघड्यावर आले आहेत.

वादळी वार्याने अनेकांची घरे क्षतिग्रस्त
मुंडगाव: अकोट तालुक्यातील मंुडगाव परिसरात २ जून रोजी वादळी वारा व पावसामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली असून, संसार उघड्यावर आले आहेत.
२ जून रोजी दुपारी ३.३० वाजता आलेल्या वादळामुळे गावकर्यांची चांगलीच पळापळ झाली. यामध्ये विलास दयाराम बावणे, धनसिंग गरगट, सुरेश बोडखे, गोपाल तळे, वामन सरकटे, संतोष इंगळे, गुरांचा दवाखाना, उर्दू शाळा, प्रमोद भारसाकळे, अ. समद अ. अजीज, गजानन दहीभात, रामदास कुर्हे आदी ग्रामस्थांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली आहेत. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. मुंडगाव-वणी वारुळा रस्त्यावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी तेथे येऊन झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. क्षतिग्रस्त झालेल्या घरांचे पंचनामे तलाठी ए. एस. रावणकार यांनी करण्यास सुरुवात केली होती तरी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.