कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:56 IST2019-04-14T13:55:30+5:302019-04-14T13:56:48+5:30
दहीहांडा : कौटुंबिक वादातून भावाने भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना दोनवाडा बु. येथे १३ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता घडली.

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या!
दहीहांडा : कौटुंबिक वादातून भावाने भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना दोनवाडा बु. येथे १३ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता घडली. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे. अंबादास श्यामराव सहारे (४८) असे मृतकाचे नाव आहे.
दोनवाडा बु. येथील अंबादास सहारे व त्यांच्या भावामध्ये शनिवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान वाद झाला. या वादातून अंबादास सहारे यांची त्यांच्या भावाने दगडाने ठेचून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी दहीहांडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)