शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

टपालमतपेट्या रामभरोसे

By admin | Updated: May 8, 2014 00:50 IST

मतपेटी वार्‍यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार


 वाशिम: सुरक्षित मतदानाचा डांगोरा पिटणार्‍या निवडणूक विभागाने टपाल मतांसाठी  ठेवलेली मतपेटी मात्र बिनधास्तपणे वार्‍यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग मधून स्थानिक तहसिल कार्यालयात  ५ मे रोजी उघडकीस आला.  निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना टपाल मतांविषयी किती गांभिर्य आहे हेही या निमित्ताने उजागर झाले आहे.
यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये १0 एप्रिल रोजी मतदान  प्रक्रिया पार पडली. सदर प्रक्रियेत सहभागी असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा या साठी निवडणूक विभागाने नेहमीप्रमाणे यावेळीही टपाल मतदानाची व्यवस्था केलेली आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सदर कर्मचारी व अधिकार्‍यांना या टपाल मतपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. सद्या सदर मतपत्रिका गोळा करण्याचे काम  सुरू झाले असुन यासाठी तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात एक पेटी ठेवण्यात आली आहे.  सदर पेटीत काही मतपत्रिकाही पडल्या आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे आजमितीला वाशिम तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात ठेवण्यात आलेली  मतपेटीच रामभरोसे आहे. लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने ही बाब अधोरेखित केली आहे.  कुणीही यावे अन् टपाल मतांसाठी ठेवलेली पेटी घेऊन पसार व्हावे असाच काहीसा प्रकार या ठिकाणचा झालेला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांना या पेटीच्या सुरक्षितेचे किंचीतही गांभिर्य दिसून येत नाही.