Maharashtra State Executive of Vanchit Bahujan Yuva Aghadi announced | वंचित बहुजन युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी जाहीर

वंचित बहुजन युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी जाहीर

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी बुधवारी जाहीर केली. युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील निलेश विश्वकर्मा यांची , तर प्रदेश महासचिव म्हूणन अकोला येथील राजेंद्र पातोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नवनियुक्त कार्यकारीणीत राज्यातील विविध भागातील कार्यकत्य्रांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. सदस्य म्हणून सुहास पुंडे, ॲड. सचिन जोरे, ऋषीकेश मनोहर नांगरे पाटील, शमिभा पाटील, रवीकांत राठोड, अमन शादाब धांगे, चेतन गांगुर्डे, अक्षय बनसोडे, संतोष किसनराव कोरके, विशाल भिवाजी गवळी, अंकुश वेताळ, विश्वजीत कांबळे, सुचित गायकवाड आणि आकाश पारवे यांचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra State Executive of Vanchit Bahujan Yuva Aghadi announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.