शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

Maharashtra Election 2019 : सर्वच मतदारसंघांत ‘बंडोबा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:21 IST

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवसही धक्कादायक राजकीय घडामोडींनी गाजला.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवसही धक्कादायक राजकीय घडामोडींनी गाजला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली उमेदवारी मागे घेत काँग्रेसच्या बंडखोर नेत्याला उमेदवारी जाहीर केली, तर याच मतदारसंघात शिवसेनेची तसेच बाळापूर, मूर्तिजापूर व अकोटमध्येही स्वपक्षाच्या विरोधातील नाराजी उमेदवारी अर्जाच्या रूपाने प्रकट झाली. आता ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यामधील किती बंडोबांना थंडोबा करण्यात नेते यशस्वी होतात, यावरच प्रत्येक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.अकोला पश्चिम हा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ ठरला. काँग्रेसने साजीद खान पठाण यांना उमेदवारी दिली; मात्र या उमेदवारीच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मदन भरगड यांनी बंड पुकारात थेट वंचित बहुजन आघाडीचा हात पकडला आहे. येथे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली इमरान पुंजानी यांची उमेदवारी मागे घेऊन अ‍ॅड. आंबेडकरांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राची ओळख करून दिली. येथे भाजप उमेदवारांच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपासमोरच आव्हान उभे केले आहे.बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक चुरस राहील, असे स्पष्ट संकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मिळाले आहेत. येथील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर, राष्टÑवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून सेनेच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. येथील विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून ‘वंचित’विरोधातच बंड पुकारले होते. त्यात शेवटच्या दिवशी डॉ. संतोष हुशे आणि गजानन दांदळे यांच्या नावाची भर पडली. ‘वंचित’कडून हुशे यांच्या नावाची चर्चा अकोट मतदारसंघासाठी होती; मात्र हुशे हे बाळापूरसाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी बाळापुरात अर्ज दाखल केला. काँग्रेस आघाडीत समाविष्ट असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुकाराम दुधे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडी धर्माला आव्हान दिले आहे.अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांची उमेदवारी रिंगणात आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेचे महादेव गवळे व भाजपचे तालुका सरचिटणीस राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी खिराडे यांनी उमेदवारी दाखल करून राष्टÑवादीच्या उमेदवाराविरोधात नाराजी स्पष्ट केली आहे. अकोट मतदारसंघात अनिल गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गावंडे हे महिनाभरापूर्वीच शिवबंधनात अडकले होते, हे विशेष!या सर्व बंडोबांना रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींसमोर अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मंगळवारी दुपारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यामधील काही बंडोबा थंड झाले, तर संभाव्य मत विभाजन टळेल, अन्यथा सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आणखी तीव्र चुरसमध्ये बदलतील.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस