शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांच्या कौलासाठी तीन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:09 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नरत आहेत.

- राजेश शेगोकारअकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीचेच चित्र पुन्हा उभे ठाकले असल्याने मतविभाजनावरच निवडणुकीचा निकाल फिरणार असल्याचे स्पष्ट आहे. गेल्यावेळी काँग्रेसने खेळलेली खेळी यावेळी कायम आहे तसेच २०१४ ची मोदी लाट आता नाही आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नवा पॅर्टन घेऊन रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत अकोला मतदारसंघातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी शहरे वगळता सर्वच शहरांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला होता. त्यामुळे यावेळी शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नरत आहेत. विशेष म्हणजे या मतांसाठी काँग्रेस व वंचितमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात अकोल्यासह आठ शहरे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ५ लाख ९० हजार ८६० मतदारांची नोंद होती. त्यापैकी ३ लाख २६ हजार ५१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६०७ मते संजय धोत्रे यांना तर १ लाख २० हजार ४७४ मते हिदायत पटेल यांना मिळाली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना केवळ ३७ हजार ७७४ मतांवर समाधान मानावे लागले. या पृष्ठभूमीवर यावेळी शहरांचा मागोवा घेतला असता भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरस कामगिरी करून आपला मतदार टिकवून ठेवल्याचे दिसते. अकोला महापालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मतदारांचा प्रातिनिधिक आढावा घेतला तर भाजपाने पालिकेत एकहाती सत्ता आणली आहे. दुसरीकडे गेल्या वेळी १८ नगरसेवकांची काँग्रेस ११ वर आणि ७ नगरसेवकांची भारिप-बमसं अवघ्या ३ नगरसेवकांवर थांबली आहे. त्यामुळे शहरी मतदारांची पसंती मिळविण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा ही आंबेडकर व पटेल यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट असून, भाजपाला आपली मतपेढी टिकविण्याचे आव्हान आहे.बाळापूर, पातूर, बार्शीटाकळीत काँग्रेस अव्वलमुस्लीमबहुल असलेल्या बाळापूर शहरात काँग्रेसने भाजपापेक्षा तिप्पट मते घेतली होती, तर पातूर व बार्शीटाकळीमध्येही काँग्रेस अव्वल होती. या तीनही शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था यावेळीही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे या मतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘हात’ मारण्याचे लक्ष्य आहे.अकोला पश्चिम तिन्ही उमेदवारांचे ‘लक्ष्य’अकोला शहरातील पश्चिम परिसर हा भाजपाचा गड असला तरी काँग्रेसनेही येथे तोडीस तोड मते घेऊन आपली ताकद अधोरेखित केली होती. विशेष म्हणजे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना शहरातून मिळालेल्या मतांमध्ये सर्वाधिक मते अकोला पश्चिममध्येच होती. त्यामुळे अकोला पश्चिम हा तीनही उमेदवारांसाठी ‘लक्ष्य’ ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा