शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेला लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST

वाहनांचा लिलाव करा ! अकाेला : महापालिकेच्या माेटरवाहन विभागात माेठ्या संख्येने जुनी वाहने भंगार अवस्थेत पडून आहेत. या वाहनांचा ...

वाहनांचा लिलाव करा !

अकाेला : महापालिकेच्या माेटरवाहन विभागात माेठ्या संख्येने जुनी वाहने भंगार अवस्थेत पडून आहेत. या वाहनांचा लिलाव हाेत नसल्यामुळे आवारात भकास चित्र पहावयास मिळते. यामध्ये २००१ साली खरेदी करण्यात आलेल्या सीटी बसेसचा समावेश आहे. यापैकी बहुतांश वाहनांमधील साहित्य लंपास झाल्याची माहिती आहे. मनपाने पुढाकार घेऊन या वाहनांचा लिलाव करण्याची गरज आहे.

पथदिव्यांची उभारणी करा !

अकाेला : महापालिका कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून त्याऐवजी नवीन विद्युत साहित्य लावण्यात आले. नवीन साहित्यामुळे विद्युत देयकांत बचत हाेणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, शहरातील टिळक राेड, खालेश्वर, नेकलेस रस्त्यावरील पथदिवे तातडीने लावण्याची गरज असताना ही कामे संथगतीने हाेत आहेत. ते काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.

उमरी रस्त्यालगतची नाली बुजवली !

अकाेला : उमरी परिसरातील मुख्य मार्गावरील पेट्राेल पंपासमाेर मुख्य नाली बुजविण्यात आल्यामुळे परिसरातील रेस्टाॅरंट, रहिवासी इमारतींमधील सांडपाणी रस्त्यात साचत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरून महापाैर अर्चना मसने दरराेज ये-जा करतात. मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे या समस्येकडे दुर्लक्ष हाेत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.

भंगार साहित्याचा उभारला ढिग

अकाेला : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या रतनलाल प्लाॅट चाैकातील उर्दू शाळेच्या आवारात स्थानिक रहिवाशांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण उभारल्याचे समाेर आले आहे. व्यावसायिक उद्देशातून भंगार साहित्याचे पाेते याठिकाणी ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दाेन दिवसांत ३ काेटींची वसुली

अकाेला : महापालिकेच्या टॅक्स विभागाने ३० व ३१ जुलै या दाेन दिवसांत अकाेलेकरांच्या खिशातून ३ काेटी १२ लाख रुपयांचा कर वसूल केला. प्रशासनाने अकाेलेकरांना शास्ती अभय याेजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिली हाेती. शेवटच्या दिवशी अकाेलेकरांनी १ काेटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. दरम्यान, प्रशासनाने शास्ती अभय याेजनेला मुदतवाढ देण्याची मागणी समाेर आली आहे.