शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

सख्यांनी घेतले केक बनविण्याचे धडे

By admin | Updated: August 4, 2014 20:30 IST

लोकमत सखी मंच: केक मेकिंग व आईसिंग कार्यशाळा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला : वाढदिवस म्हटला की हमखास आठवतो तो केक. केकशिवाय वाढदिवस कदाचितच कुठे साजरा होत असेल. अशा या केकला बनविण्याचे आणि सजविण्याचे तंत्र शुक्रवारी सख्यांनी आत्मसात केले. केक मेकिंग वा आईसिंग कार्यशाळेला सख्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमत सखी मंचच्यावतीने दुसर्‍यांदा हॉटेल सेंटर प्लाझा येथ केक मेकिंग व आईसिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन राजश्री प्रशांत देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ह्यलोकमतह्णचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मंचावर शेफ गजानन तायडे, चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्ली येथील सीमा सारडा व राजश्री लद्दड उपस्थित होत्या. या कार्यशाळेत सख्या मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्ली येथील शेफ गजानन तायडे तसेच सीमा सारडा यांनी सख्यांना मार्गदर्शन केले. गजानन तायडे यांनी सोप्या पद्धतीने केक बनवून सजविणे शिकविले. तायडे यांनी आईसिंग फेस्टिवल केक, आईसिंग डिजाइनर केक, आईसिंग चॉकलेट केक, आईसिंग फ्लावर बास्केट केक, आईसिंग बार्बी डॉल केक बनविणे शिकविले. राजश्री लद्दड यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट केक बनविणे शिकविले. याशिवाय बिस्किट केक, इंडियन ब्लक फॉरेस्ट आणि मार्बल केक सोप्या पद्धतीने बनविणे शिकविले. यावेळी सख्यांना तीन प्रकारचे केक बनविण्याची रेसेपी झेरॉक्स करून वाटण्यात आली. कार्यशाळेसाठी सखी मंच विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले. संचालन लोकमत सखी मंच संयोजिका मीनाक्षी फिरके यांनी केले.