शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

उमा, पिंळशेडा, शिवण प्रकल्पांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने महत्त्वाचा असलेल्या उमा प्रकल्पासह पिंळशेडा, शिवण या लघुप्रकल्पातही निम्म्यापेक्षा ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने महत्त्वाचा असलेल्या उमा प्रकल्पासह पिंळशेडा, शिवण या लघुप्रकल्पातही निम्म्यापेक्षा कमी जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रकल्प निम्म्यापेक्षा अधिक भरले होते. यावर्षी शिवण लघु प्रकल्पात कमी जलसाठा असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील उमा प्रकल्पावर लंघापूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत. गतवर्षी हा प्रकल्प पिंपळशेंडा लघुप्रकल्प बऱ्यापैकी भरल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. ११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या लंघापूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ खेड्यांसाठी ०.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा राखीव ठेवण्यात येतो, तर २२४१ हेक्टर शेती सिंचनासाठी ६ ते ७ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव आहे; मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या प्रकल्पात केवळ २३. ११ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. अशीच स्थिती कायम राहिली, तर भविष्यात मोठ्या प्रमाणात या तालुक्यावर जलसंकट ओढविण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कमी पाऊस झाल्याने धरणे भरली नसल्याने भविष्यात तालुक्यातील बागायती शेती व रब्बी हंगामात या पाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात येणार असून, तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे हे निश्चित. (फोटो)

--------------------

उमा प्रकल्पात २३.११ टक्के जलसाठा

आता उपलब्ध असलेल्या जलसाठ्यातून बाष्पीभवन वगळून केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकेल, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे अशक्यप्राय होईल, उमा प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत २३.११ टक्के, उपलब्ध आहे. शिवण आणि पिंपळशेंडा लघु प्रकल्पातून पाण्याचा केवळ शेती सिंचनासाठी उपयोग होतो; परंतु अंत्यत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याने पीक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.