शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पाणीटंचाईने होरपळले ‘लक्ष्मी’चे आयुष्य; विहिरीत पडल्याने देतेय मृत्यूशी झुंज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:35 PM

अकोला : भीषण पाणीटंचाईमुळे शाळेत जाण्याच्या वयातच विहिरीवर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडलेली मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील १३ वर्षीय लक्ष्मी नारायण ठाकरे ३0 फूट विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी वणवण भटकत आहेत.

ठळक मुद्देआर्थिक मदतीसाठी आई-वडिलांची भटकंती  लोकमत मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भीषण पाणीटंचाईमुळे शाळेत जाण्याच्या वयातच विहिरीवर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडलेली मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील १३ वर्षीय लक्ष्मी नारायण ठाकरे ३0 फूट विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी वणवण भटकत आहेत.

मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथे भीषण पाणीटंचाई आहे. गावात एकच सार्वजनिक विहीर असून, या विहिरीत शेतातील एका विहिरीतून पाइपद्वारे पाणी सोडण्यात येते. गत तीन दिवसांपासून गावात विद्युत पुरवठाच नसल्याने गावकर्‍यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. रविवारी विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर विहिरीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे विहिरीवर गावकर्‍यांची एकच झुंबड उडाली. सहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या लक्ष्मीचे वडील नारायण ठाकरे हे मजुरीसाठी कामावर गेले होते. त्यामुळे पाणी भरण्याची जबाबदारी लक्ष्मीवर आली. लक्ष्मी अन्य मुलींसोबत विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. विहिरीमध्ये एका कोपर्‍यात थोडे पाणी होते. पाणी बाहेर काढणे सोपे नव्हते. पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना लक्ष्मी ३0 फूट खोल विहिरीत कोसळली. विहिरीमध्ये खडक असल्याने तिच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी विहिरीमध्ये उतरून लक्ष्मीला बाहेर काढले. तोपर्यंत डोके व हातातून बराच रक्तस्राव झाला होता. लक्ष्मीला मानोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला व गंभीर दुखापत असल्याने डॉक्टरांनी तीला अकोल्याला हलविले. लक्ष्मीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील मोलमजुरी करतात. दोन मुली व एका मुलाच्या शिक्षणाचा व पालन पोषणाचा खर्चही त्यांना पेलवत नाही. सध्या लक्ष्मीवर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, त्याकरिता ४0 हजार रुपयांची गरज आहे. त्याकरिता लक्ष्मीचे आई-वडील पैशांसाठी वणवण भटकत आहेत. गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत दिली. मात्र, लक्ष्मीला आणखी मदतीची गरज आहे. 

गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली मदत लक्ष्मीच्या घरातील आर्थिक परिस्थितीची जाणीव तिच्या शाळेतील शिक्षकांना आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर गावातील तरुणांनी गावात लोकवर्गणी करून १२ हजार रुपयांची मदत दिली आहे. तसेच आणखी गावात वर्गणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयWaterपाणी