शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

मुलं पाहतील पालकांच्या बोटांवरची ‘शाई’!

By admin | Updated: October 14, 2014 01:27 IST

मतदार जागृतीसाठी अकोला येथे अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांना आज दिला जाणार गृहपाठ

संतोष येलकर / अकोलाविधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्यामध्ये मंगळवारी जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी गृहपाठ दिला जाणार आहे. हा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी होणार्‍या मतदान प्रक्रियेत, आई-वडिलांनी मतदानाचा हक्क बजावला की नाही, याबाबत मुलं आपल्या आई-वडिलांच्या बोटावरील मतदानाची शाई पाहणार आहेत.विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात बुधवार, १५ ऑक्टोबर मतदान घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्येच जिल्हय़ातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी मतदानासंबंधी गृहपाठ (होमवर्क) दिला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हय़ातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी ह्यहोमवर्कह्ण दिले जाणार असून, या ह्यहोमवर्कह्णची तपासणी मतदानाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी शिक्षकांकडून केली जाणार आहे. त्यानुषंगाने मतदानासंबंधीच्या ह्यहोमवर्कह्णमधील प्रश्नांची उत्तरे लिहून, होमवर्क पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मतदान प्रक्रियेत आपल्या आई-वडिलांसह घरातील किती जणांनी मतदान केले, यासंबंधीची माहिती घ्यावी लागणार आहे. एवढेच नाही तर आई-वडिलांनी मतदान केल्याबाबत त्यांच्या बोटावरील मतदानाची शाई बघून मुलं खात्री करून घेणार आहेत.४00 शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना जिल्हाधिकार्‍यांचे पत्र!विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याकरिता, मदानासंबंधी विद्यार्थ्यांना ह्यहोमवर्कह्ण देण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील ४00 शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र दिले आहे. तसेच ९0 केंद्रप्रमुखांनाही यासंदर्भात पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत, असे मतदार जागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्रकाश अंधारे यांनी सांगितले.