शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून चिमुकल्याची हत्या

By admin | Updated: February 27, 2015 01:42 IST

आंबोडा गावातील घटना ; पोत्यात बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला.

आकोट : तालुक्यातील अंबोडा येथील पोलीस पाटलाच्या ८ वर्षीय मुलाचे अज्ञात आरोपीने अपहरण करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे प्रेत एका पोत्यामध्ये बांधून विहिरीत टाकून दिल्याची घटना २६ फेब्रुवारीला उघडकीस आली. आकोट तालुक्यातील आंबोडा येथील आदिवासी समाजातील पोलीस पाटील महेश जानराव शिवरकर यांचा मुलगा शुभम हा २५ फेब्रुवारीला घराबाहेर खेळत होता. खेळत असलेला शुभम आढळत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी गावामध्ये शोध घेतला; परंतु तो दिसला नाही. अखेर महेश शिवरकर यांनी त्याबाबत आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वत्र नाकेबंदी करीत शोध मोहीम सुरू केली. नातेवाईकांनीसुद्धा संपूर्ण परिसर २५ फेब्रुवारीच्या दुपारपासून पिंजून काढला होता. दरम्यान, २६ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास बोर्डी-रामापूर शेत रस्त्यावरील मुज्जमिल यांच्या शेतातील विहिरीत संशयास्पद स्थितीत एक पोते तरंगत असल्याचे काही गावकर्‍यांना आढळून आले. त्यांनी लगेच ही बाब ग्रामीण पोलिसांना कळविली. ताबडतोब ठाणेदार किशोर शेळके हे त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विहिरीतील पोते बाहेर काढले असता त्यामध्ये अपहृत शुभमचा मृतदेह दिसून आला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त निघाले होते. त्याचप्रमाणे गळा आवळल्याच्या खुणासुद्धा दिसून आल्यात. गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्याचे आई-वडील व नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. पोलिसांनी शुभमचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री आंबोडा गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, ठाणेदार किशोर शेळके, कैलास नागरे यांच्यासह मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; गुरुवारी भादंविच्या ३0२, २0१ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.