शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-जालना मार्गाला सिग्नल नाही

By admin | Updated: February 27, 2015 01:25 IST

बुलडाणा जिल्हावासीयांची निराशा; जिल्ह्यातील रेल्वेच्या विकासाबाबत धोरणात्मक घोषणा नाही.

बुलडाणा : खामगाव-जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत रेल्वे अर्थसंकल्पात कुठलेही सुतोवाच नसल्यामुळे जिल्हावासीयांची निराशा झाली. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असलेल्या या रेल्वे मार्गाला भाजपा सरकारच्या काळात ह्यअच्छे दिनह्ण येतील, हे आश्‍वासनही या निमित्ताने फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे लोकआंदोलन समितीकडून नवे सरकार आल्यापासून सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांचे प्रश्न मांडून जालना रेल्वे मार्गाबाबत राज्यशासनाने हमीपत्र द्यावे, अशी मागणी केली होती. राज्यशासनाने या मार्गाबाबत ५0 टक्के खर्चाचे हमीपत्र केंद्र सरकारला दिले असते तर गुरूवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात खामगाव-जालना मार्गाविषयी काही घोषणा झाली असती. विशेष म्हणजे बुलडाणा अर्बनने या मार्गासाठी कर्ज रोखे उभारण्याची घोषणा केली होती. खामगाव-जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बर्‍हाणपूर-सोलापूर या ४५0 कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली.या मार्गाला मंजुरी मिळाली असती तर खामगाव-चिखली-जालना असा ६0 कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती. विशेष म्हणजे चिखली-मलकापूर अशा कुठल्याही मार्गाची मागणी नसताना २00९ च्या अर्थ संकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली; मात्र त्या दृष्टीने पुढे काम झाले नाही. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी रेले अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त केली. रेल्वे अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांसंदर्भातील विविध प्रश्न, नव्या गाड्यांचा थांबा, नव्या गाड्या सुरू करणे, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा अशा अनेक प्रश्नांबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांना निवेदन दिले होते. ते महाराष्ट्रातील असल्याने या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्या जाईल, असे वाटले होते; मात्र रेल्वेमंत्र्यांनी निराशा केली असल्याचे जाधव यांनी सांगीतले.