शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कनकपुरा ते रोयापूरम पार्सल गाडीला अकोल्यात थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 10:38 IST

आठवड्यातून एकदा चालणारी ही गाडी डाउन व अप प्रवासादरम्यान दर शनिवार व बुधवारी अकोला रेल्वेस्थानकावर थांबणार आहे.

अकोला : कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची प्रवासी सेवा बंद असली, तरी मालवाहतूक सेवा सुरू आहे. राजस्थान राज्यातील कनकपुरा ते कर्नाटक राज्यातील रोयापूरमदरम्यान ३१ जुलैपासून विशेष पार्सल गाडी सुरू करण्यात आली असून, आठवड्यातून एकदा चालणारी ही गाडी डाउन व अप प्रवासादरम्यान दर शनिवार व बुधवारी अकोलारेल्वेस्थानकावर थांबणार आहे.लॉकडाऊनदरम्यान आवश्यक साधनसामग्रीचे वहन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पार्सल गाड्या चालवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कनकपुरा ते रोयापूरम ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक -००९७१ डाऊन कनकपुरा ते रोयापूरम ही गाडी दर शुक्रवारी कनकपुरा स्थानकावरून दुपारी १२.४० ला प्रस्थान करेल आणि सोमवारी रात्री १२.४० ला रोयापूरम पोहोचेल. या गाडीला विविध ठिकाणी थांबा देण्यात आला असून, शनिवारील दुपारी १३.३० ला ही गाडी भुसावळ स्थानकावर येईल. तेथून प्रस्थान केल्यानंतर दुपारी २.४५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. अकोल्याहून नांदेड मार्गे निजामाबाद, सिकंदराबाद, रायचूर, गुंटकल, धर्मावरम, बेंगळुरू असा प्रवास करत ही गाडी सोमवारी रात्री रोयापूरमला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक - ००९७२ अप रोयापूरम ते कनकपुरा ही गाडी ४ आॅगस्टपासून प्रत्येक मंगळवारी रोयापूरम येथून दुपारी ०२.३० ला प्रस्थान करेल आणि गुरुवारी सायंकाळी ०५.१० ला कनकपुरा पोहोचेल.परतीच्या प्रवासातही ही गाडी दर बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी अकोला स्थानकावर येणार आहे. येथून भुसावळ, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, रतलाम, चित्तौडगढ, भिलवाडा, अजमेर असा प्रवास करत ही गाडी कनकपुराला पोहोचणार आहे. ज्या लोकांना किंवा व्यावसायिकांनाकाही साधनसामग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक