शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची जूगाड टेक्नॉलॉजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:54 IST

तेल्हारा :  शेतामध्ये वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी मेटाकुटीला आला. रात्री चे जागर करून पिक वाचविण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहेत. अशाच एका जुगाड टेक्नॉलॉजी चा वापर शेतकरी वन्यप्राणी संरक्षणासाठी करित आहेत. 

ठळक मुद्दे पिक वाचविण्यासाठी विविध शक्कल लढवून पिकांचे रक्षण करताना दिसतात. शेतकरी दिपक तायडे, कोरडे यांनी आपल्या कल्पनेतून हिवरखेड येथील वेल्डिंग मशीन वर नेहमी  वापरातील साहित्य वापरून वाजणारे कोपर तयार करून पिक रक्षणाची जुगाड टेक्नॉलॉजी केली.कमी खर्चात तयार केलेल्या या जुगाड टेक्नॉलॉजीने हरिण कळप, डुकरांचा त्रास कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

- सत्यशील सावरकर 

तेल्हारा :  शेतामध्ये वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी मेटाकुटीला आला. रात्री चे जागर करून पिक वाचविण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहेत. अशाच एका जुगाड टेक्नॉलॉजी चा वापर शेतकरी वन्यप्राणी संरक्षणासाठी करित आहेत.        तेल्हारा  तालुक्यातील बहुतांश भाग बागायती क्षेत्रात मोडत असल्याने पूर्व मान्सून कपासी मोठ्या प्रमाणात पेरा होतो. यावर्षी प्रखर उन्ह, पाण्याने गाठलेला तळ,  बोंड अळीची धास्ती यामुळे कपासी पेरा कमी असला तरी कळासपट्टी भागात खंडाळा, सदरपूर, चितलवाडी, अडगाव, हिवरखेड, बेलखेड, वारखेड, सौदळा, हिंगणी, दानापूर भागात  मान्सूनपूर्व कपासी पेरा होतो.  मे महिन्यात लावलेली कपाशी चे वन्य प्राण्यांच्या पासून रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्र पाळीत जागर करित आहेत तर दिवसा सुद्धा हरणाचे कळपा पासून पिक वाचविण्यासाठी विविध शक्कल लढवून पिकांचे रक्षण करताना दिसतात. काही शेतकरी डफडे, ताशे वाजवून, बुजगावणे लावून रक्षण करतात.         तालुक्यातील हिंगणी,  एदलापूर, येथील शेतकरी दिपक तायडे, कोरडे यांनी आपल्या कल्पनेतून हिवरखेड येथील वेल्डिंग मशीन वर नेहमी  वापरातील साहित्य वापरून वाजणारे कोपर तयार करून पिक रक्षणाची जुगाड टेक्नॉलॉजी केली. कमी खर्चात तयार केलेल्या या जुगाड टेक्नॉलॉजीने हरिण कळप, डुकरांचा त्रास कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. लागणारे साहित्य - कुलर चा पंखा, हलका कोपर सायकलचा चाकाचा बुदला, अॅक्सल याचा वापर करून वेल्डिंग मशीन वर तयार केले जाते.  दरवर्षी मान्सूनपूर्व कपासीसाठी सुरूवातीला वन्यप्राणी त्रास देतात. पिक रक्षण करताना जीवमेटाकुटीस येतो त्या त्रासातून सुटण्यासाठी केलेली जुगाड म्हणजे आमचे वाजन यंत्र. ...दिपक तायडे एदलापूरकल्पक शेतकरी

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराFarmerशेतकरी