शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जावयाची हत्या करणा-या साळय़ास जन्मठेप!

By admin | Updated: December 27, 2016 02:30 IST

सहा महिन्यांमध्येच प्रकरण काढले निकाली.

अकोला, दि. २६- किरकोळ वादातून जावयाची धारदार चाकूने भोसकून हत्या करणार्‍या साळय़ास तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयाने सोमवारी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. सहा महिन्यांमध्येच न्यायाधीश जाधव यांनी प्रकरण निकाली काढले, हे येथे विशेष. हरिहरपेठेतील पोलीस चौकीजवळ १७ मार्च २0१५ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजतादरम्यान आरोपी सय्यद चाँद सय्यद मेहमूद याने त्याचा जावई व व्याही मजीद खा सखावत खा याच्यासोबत तुझ्या घरातील सर्व लोक माझ्या घरी येतात; परंतु मला तुझ्या घरी येऊ दिल्या जात नाही, या कारणावरून वाद घातला आणि धारदार चाकूने त्याच्या मांडीवर वार केले. यावेळी पोलीस कर्मचारी विजय सिरसाट, वाहतूक पोलीस रवी खंडारे, सविता गेडाम, ज्योती माहोरे, होमगार्ड सुरेंद्र मेहरे हरिहरपेठेतील पोलीस चौकीजवळ नाकाबंदी करीत असताना, त्यांना मजीद खा याच्या ओरडण्याचा आवाज आला. हे सर्व पोलीस कर्मचारी आवाजाच्या दिशेने धावले असता, त्यांना आरोपी सय्यद चाँद हा मजीदवर चाकूने वार करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी लगेच आरोपी सय्यद चाँदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाकूही जप्त केला आणि जखमी मजीद खा याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी सय्यद चाँद सैयद मेहमूद याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. जखमी मजीदच्या मांडीची महत्त्वाची रक्तवाहिनी कापल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष केदासे यांनी केला. त्यांनी ९ जून २0१६ रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हत्या प्रकरणाची सुनावणी तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने एकूण आठ साक्षीदार तपासले. आरोपी सय्यद चाँद याच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आणि ५00 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाचीही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली. यामुळे केली होती हत्याआरोपी सय्यद चाँद याची बहीण मृतक मजीदची पत्नी आहे आणि आरोपीची मुलगीसुद्धा मृतकच्या मुलाला दिली आहे. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाचे आरोपीकडे व आरोपीचे मृतकाकडे नेहमी येणे-जाणे असायचे; परंतु आरोपी सय्यद चाँद हा नेहमीच मृतकाच्या घरी दारू पिऊन यायचा आणि हैदोस घालायचा. त्यामुळे मृतक व त्याचे नेहमीच वाद होत असत. मृतकाने त्याला त्याच्या घरी येण्यास मज्जाव केला होता. याचा राग आरोपी सय्यद चाँदच्या मनात होता. त्यामुळे त्याने चाकूने भोसकून मजीद खा याची हत्या केली होती.