शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना नाकारली ‘एसटी’ पासची सवलत

By admin | Updated: July 18, 2015 01:45 IST

विद्यार्थ्यांना नाहक भूर्दंड; २0 किमी पेक्षा कमी अंतरावर पास देण्यास नकार.

अकोला : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाने २0 किलोमीटर अंतरातील प्रवासाकरिता शैक्षणिक सवलतीची पास नाकारल्याने त्यांना शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. तर दुसरीकडे यावर पर्याय म्हणून खासगी पास काढण्याचा सल्लादेखील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांकडून देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांंना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये शैक्षणिक सवलत देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने एसटी पासकरिता बस स्थानकावर विद्यार्थ्यांंची गर्दी वाढली आहे. यामध्ये शहरालगतच्या ग्रामीण भागातील तसेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांंची संख्या अधिक आहे. परंतु, यंदा राज्य परिवहन महामंडळातर्फे आयटीआय आणि टंकलेखन (टाइपिंग) प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना २0 किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी शैक्षणिक सवलत नाकारण्यात आली आहे. एवढेच नाही, तर खासगी पास काढण्याचे सल्लेदेखील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांंना एसटी पास काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. या संदर्भात आयटीआयच्या काही विद्यार्थ्यांंनी बस स्थानक व्यवस्थापकांची भेट घेऊन पास मिळत नसल्याचे सांगितले. या संदर्भात आयटीआयच्या विद्यार्थ्यांंचे गाव २0 किलोमीटरच्या आत असेल तर, अशा विद्यार्थ्यांंना पास देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले नसल्याचे बस स्थानक व्यवस्थापकांनी यावेळी विद्यार्थ्यांंना सांगितले. आयटीआयच्या विद्यार्थ्यांंना शैक्षणिक सवलतीपासून डावलण्यात येत असल्याने त्यांना शैक्षणिक प्रवासाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत असून, विद्यार्थ्यांंमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.