शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

कामात अनियमितता; महावितरणच्या अकोला परिमंडळातील आठ अभियंत्यांना ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 6:25 PM

दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागिय अधिकाऱ्यांसह एकूण आठ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहे.

अकोला:नेमून दिलेल्या कामात अनियमितता आणि कार्यालयीन बेशिस्तीचा ठपका ठेवित महावितरणच्याअकोला परिमंडलांतर्गत कार्यरत दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागिय अधिकाऱ्यांसह एकूण आठ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहे. एका महिन्याच्या आत या अभियंत्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याचा गर्भित इशाराही दिलीप घुगल यांनी दिला आहे.अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या वाशिम, बुलढाणा आणि अकोला या तिनही मंडलांतर्गत कार्यरत वरिष्ठ अधिकारी आणि अभियंत्यांच्या जिल्हानिहाय स्वतंत्र आढावा बैठक घेत प्रादेशिक संचालकांनी तेथील वीज वितरण यंत्रणा, बिलींग आदी विषयांचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकांदरम्यान वाशिम आणि खामगाव विभागांसोबतच कारंजा, वाशिम, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली आणि लोणार या उपविभागांचे काम असमाधानकारक असल्याने दिलीप घुगल यांनी नाराजी व्यक्त करीत येथील वरिष्ठ अधिका-यांविरोधात कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश दिले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावेपरिमंडलातील ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यासोबतच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे असे स्पष्ट निर्देश दिले. काही उपकेंद्रांना आकस्मिक भेटी देत पूर्ण पाहणीअंती तेथील देखभाल व दुरुस्तीच्या कामातील तृटी दूर करण्याकरिता उपाययोजना सुचविल्या व त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेवीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे, त्यांच्यासोबत सौजन्याने वागणे, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे त्वरीत निराकरण करणे, त्यांच्या फोनला योग्य प्रतिसाद देण्याबाबतही दिलीप गुगल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस उपविभागीय कार्यालये आणि शाखा कार्यालयात भेटी देत तेथील बिलिंग, अखंडित वीज पुरवठा आणि उपकेंद्रातून होणाº्या ट्रीपिंगचा आढावा घेत त्याची नोंद मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे सुनिश्चित करावे. अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या उपविभागीय कार्यालये स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मिळावे घेण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालक यांनी यावेळी केल्या.

सौर कृषीपंप योजनेबाबत ग्राहकांना मार्गदर्शन  देण्यात यावे, नवीन वीज पुरवठा घेण्याकरिता पैशाचा भरणा करूनही प्रलंबित असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना प्राधान्याने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. उच्चदाब वितरण प्रणाली व सौर कृषीपंप योजनेबाबत ग्राहकांना कार्यालयीन स्तरावर योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे, ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यातही याबाबत ग्राहकांना विस्तृत मार्गदर्शन करण्यासोबतच महावितरणच्या कामकाजाची, प्रगतीची व काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि पत्रकारांना उपलब्ध करून  देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या बैठकांना अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा राहुल बोरीकर यांच्यासोबत तिनही मंडलांचे अधीक्षक अभियंते, सर्व कार्यकारी अभियंते, वरिस्ठ अधिकारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण