रोपवाटिकेत अनियमितता; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:56 AM2020-01-22T10:56:59+5:302020-01-22T10:57:09+5:30

बार्शीटाकळी येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयाविरुद्ध निलंबनाची कारवाई करून, विभागीय चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २० जानेवारी रोजी अकोल्याच्या उपवनसंरक्षकांना दिला.

Irregularities in the nursery; Forestry officer's suspension ordered! | रोपवाटिकेत अनियमितता; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आदेश!

रोपवाटिकेत अनियमितता; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आदेश!

googlenewsNext

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारवा येथील वन विभागाच्या रोपवाटिकेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने, बार्शीटाकळी येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयाविरुद्ध निलंबनाची कारवाई करून, विभागीय चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २० जानेवारी रोजी अकोल्याच्या उपवनसंरक्षकांना दिला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारवा येथे वन विभागाच्या रोपवाटिकेत रोपे निर्मितीचे काम करण्यात येते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) व रोहयो शाखा अंतर्गत अभियंत्यांच्या पथकामार्फत गत ४ डिसेंबर रोजी दगडपारवा येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील कामाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान रोपवाटिकेतील कामाच्या ठिकाणी मजुरांचे हजेरीपत्रक उपलब्ध नव्हते व हजेरीपत्रक उपलब्ध करून देण्यात आले नाही, रोपांसंदर्भात माहितीचे कोणतेही रजिस्टर, कामाच्या नावाचे दर्शनीय फलक आढळून आले नाही आणि रोपांची गुणवत्ताही खराब आढळून आली. रोपवाटिकेतील कामात अनियमितता आढळून आल्याने, यासंदर्भात बार्शीटाकळी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ११ डिसेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली; मात्र वनपरिक्षेत्र अधिकाºयाकडून कारणे दाखवा नोटीसचे उत्तरही जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करून, विभागीय चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २० जानेवारी रोजी अकोल्याच्या उपवनसंरक्षकांना दिला.


रोपेही आढळली मरणासन्न अवस्थेत!
दगडपारवा येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील कामाची तपासणी पथकामार्फत करण्यात आली. तपासणीमध्ये रोपवाटिकेतील कामात अनियमित आढळून आली. यासोबतच रोपवाटिकेत असलेली रोपेही मरणासन्न अवस्थेत आढळून आली.

दगडपारवा येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील कामात अनियमितता आढळून आल्याने, बार्शीटाकळी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
- राहुल वानखेडे, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो)

Web Title: Irregularities in the nursery; Forestry officer's suspension ordered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.