शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:53 IST

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी प्रथमच भाजप शिक्षक आघाडीही कामाला लागली आहे.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिक्षक संघटनांचे इच्छुक नेते कामाला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. शिक्षक संघटनांसोबतच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी प्रथमच भाजप शिक्षक आघाडीही कामाला लागली आहे.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे श्रीकांत देशपांडे हे आमदार आहेत. यापूर्वी दोन टर्म हा मतदारसंघ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वसंतराव खोटरे यांच्या ताब्यात होता; परंतु विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात फूट पडल्यामुळे खोटरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गत पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये मोठे बदल झाले आहेत.या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेक शिक्षक नेते इच्छुक आहेत. प्रथमच भाजपच्या शिक्षक आघाडीची यवतमाळचे नितीन खर्चे यांनी मतदारसंघात बांधणी केली असून, त्यांनी भाजपकडे या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. खर्चे हे अभाविपचे माजी प्रांताध्यक्ष आहेत. यासोबतच विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांनीही जोरदार तयारी चालविली आहे.शिक्षक आघाडीकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे हे पुन्हा नशीब आजमावणार आहेत. देशपांडे यांच्याविषयी शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना शिक्षक मतदार यंदा कशी साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच शिक्षक महासंघाकडून शेखर भोयर गत काही वर्षांपासून तयारी करीत आहेत. एवढेच नाही तर माजी आमदार यू.व्ही. डायगव्हाणे यांची विमाशिसं, माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्या पश्चिम विदर्भ माध्य. शिक्षक संघाकडून विकास सावरकर हे इच्छुक आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक सेना, नुटासुद्धा शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत; परंतु शिक्षक परिषद, नुटा, शिक्षक सेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजप शिक्षक आघाडी रिंगणात उतरणार असल्याने, शिक्षक परिषदेची काय भूमिका राहणार आहे, याकडे लक्ष वेधल्या गेले आहे.

उमेदवारी आणखी नावे चर्चेत!शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी अमरावतीच्या संगीता शिंदे, रमेश चांदूरकर, वाशिमचे किरण सरनाईक, राजकुमार बोनकिले या शिक्षक नेत्यांचीसुद्धा नावे चर्चेत आहेत.

या संघटनांमध्ये युती झाली तर...पदवीधर मतदारसंघात बी.टी. देशमुख हे पाच वेळा आमदार होते. वसंतराव खोटरे हे १० वर्ष आमदार होते. पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये नुटा, विमाशिसं, विजुक्टा अशी युती असायची, त्यामुळे दोन्ही मतदारसंघात त्यांचा दबदबा होता. कालांतराने या संघटनांमध्ये फूट पडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा शिक्षक मतदारसंघासाठी या संघटना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. या संघटना एकत्र आल्या तर चित्र वेगळे राहू शकते.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकElectionनिवडणूक