आता महिला शेतकरीही विदेशात जाऊन शिकणार आधुनिक शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:28 IST2025-05-31T07:27:59+5:302025-05-31T07:28:08+5:30

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी शिक्षण व ६० वर्षे वयाची मर्यादा शिथिल

Indian women farmers will also go abroad to learn modern agriculture | आता महिला शेतकरीही विदेशात जाऊन शिकणार आधुनिक शेती

आता महिला शेतकरीही विदेशात जाऊन शिकणार आधुनिक शेती

अकोला : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी शिक्षण व ६० वर्षे वयाची मर्यादा शिथिल केल्याने या वर्षी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या अभ्यासासाठी विदेशात जाता येणार आहे. विशेष म्हणजे महिलांना या दौऱ्यात प्राधान्य राहणार आहे.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत 'परदेश अभ्यास दौरा योजना' राबविण्यात येते. सन २०२४-२५ मध्ये यासाठी शेतकऱ्यांना किमान बारावी शिक्षण व वयोमर्यादा २५ ते ६० वर्षे अशी अट होती. मात्र, नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत या अटी रद्द केल्या. आता ६० वर्षावरील शेतकऱ्यांनाही परदेश दौऱ्यावर जाता येईल. शैक्षणिक अर्हतेची अटही लागू राहणार नाही.

यंदा या देशांचा समावेश

मागील वर्षी युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड हे देश अभ्यास दौऱ्यासाठी निवडले गेले होते. यंदा यामध्ये युरोप, इसाईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

योजना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल २ झाल्यामुळे २०२४-२५ मध्ये अंतिम झालेली शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. मात्र, पूर्वी निवड झालेले शेतकरी पुन्हा अर्ज करू शकतात व पात्रतेनुसार त्यांचा विचार करण्यात येणार आहे.
 

Web Title: Indian women farmers will also go abroad to learn modern agriculture