शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ; नागरिक हैरान

By admin | Updated: November 16, 2014 00:50 IST

अकोला शहरात स्वच्छतेचा अभाव, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष.

अकोला : राज्यात सर्वत्र डेंग्यूचा उद्रेक असताना डासांच्या उत्पत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी मनपाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजना अत्यंत तोकड्या सिद्ध ठरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डासांची उत्पत्ती करणार्‍या खदानींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शहरात हिवताप व डेंग्यूसदृष्य आजाराची साथ पसली आहे. डेंग्यूचा धस्का घेत नागरिकांनी परिसर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यास प्रारंभ केला असला तरी डासांचा उद्रेक कमी होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर स्वच्छता व डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी मनपाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना तोकड्या सिद्ध ठरत आहेत. सिंधी कॅम्प-खदान, आदर्श कॉलनी, बलोदे लेआऊट सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खदानींमध्ये पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यात पाणवनस्पती उगविली असून, लगतच्या वसत्यांमधील सांडपाणी व कचरा देखील त्यात येऊन पडतो. परिणामी, परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. ह्यबडी-खदानह्ण, ह्यवाठूरकर-खदानह्ण, ह्ययुसुफअली-खदानह्ण, ह्यनुरानी-खदानह्ण अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या खदानींमध्ये साचलेल्या घाण पाण्यात डासांची मोठय़ा प्रमाणावर उत्पत्ती होते. ४ वर्षांपूर्वी मनपाने खरेदी केलेल्या २८ फॉगिंग मशिनपैकी आज रोजी केवळ चार फॉगींग मशिन सुरू आहेत. ३६ प्रभागांसाठी चार मशिन तोकड्या पडत आहेत.